TRENDING:

Skin Care : Waxing की Razor केस हटवण्यासाठी योग्य पद्धत कोणती? महिलांनी काय करावं? इथे वाचा

Last Updated:
वॅक्सिंग त्वचेला ग्लो देते, पण ती प्रक्रिया थोडी वेदनादायक असते; तर दुसरीकडे रेजर वापरणं पूर्णपणे पेनलेस आहे, पण केस पटकन पुन्हा वाढतात. त्यामुळे प्रत्येक स्त्रीच्या मनात हा प्रश्न कायम असतो की 'नेमकं माझ्यासाठी योग्य काय?'
advertisement
1/6
Waxing की Razor केस हटवण्यासाठी योग्य पद्धत कोणती? महिलांनी काय करावं? इथे वाचा
सुंदर, मऊ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अनेक महिला चेहऱ्यावरचे, हात-पायांवरील अनावश्यक केस काढतात. पण हा निर्णय कधीच सोपा नसतो. कारण एकीकडे वॅक्सिंग त्वचेला ग्लो देते, पण ती प्रक्रिया थोडी वेदनादायक असते; तर दुसरीकडे रेजर वापरणं पूर्णपणे पेनलेस आहे, पण केस पटकन पुन्हा वाढतात. त्यामुळे प्रत्येक स्त्रीच्या मनात हा प्रश्न कायम असतो की 'नेमकं माझ्यासाठी योग्य काय?' चला, याचं सविस्तर उत्तर जाणून घेऊया.
advertisement
2/6
रेजर : जलद आणि सोपा पर्यायआजच्या बिझी लाइफस्टाइलमध्ये वेळ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट झाली आहे. त्यामुळे अनेक महिला फेशियल रेजर किंवा बॉडी रेजर वापरणं पसंत करतात. हा उपाय पूर्णपणे वेदनारहित, जलद आणि घरच्या घरी करता येणारा आहे.
advertisement
3/6
रेजर वापरण्यापूर्वी त्वचेवर अॅलोवेरा जेल किंवा फेस ऑईल लावावं. त्यानंतर सौम्यपणे वरच्या दिशेने रेजर फिरवावं. यामुळे त्वचा तत्काळ स्मूथ आणि स्वच्छ दिसते.पण लक्षात ठेवा, रेजरचा परिणाम फक्त 2 ते 3 दिवस टिकतो. त्यानंतर केस पुन्हा वाढतात. चुकीच्या दिशेने शेव्ह केल्यास कट, कोरडेपणा किंवा संसर्गाचाही धोका असतो.
advertisement
4/6
वॅक्सिंग : दीर्घकाळ टिकणारा पण थोडा पेनफुल पर्यायवॅक्सिंग हा पारंपरिक आणि प्रभावी उपाय आहे. यामुळे केस मुळासकट निघतात आणि त्वचा बराच काळ गुळगुळीत राहते. एकदा वॅक्सिंग केल्यानंतर 3 ते 4 आठवडे केस परत येत नाहीत. नियमित वॅक्सिंग केल्यास केस हलके, पातळ आणि कमी वाढतात. तसेच त्वचेला एक नैसर्गिक ग्लो मिळतो. मात्र, हा उपाय थोडा वेदनादायक असतो. सेंसिटिव्ह स्किन असलेल्या महिलांना रेडनेस, खाज किंवा अॅलर्जी होण्याची शक्यता असते.
advertisement
5/6
मग शेवटी कोणता पर्याय बेस्ट?दोन्ही उपाय योग्य आहेत फक्त तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार निवड करणं गरजेचं आहे.जर तुमची त्वचा संवेदनशील (Sensitive) असेल, तर रेजर वापरणं योग्य. पण नेहमी नवीन आणि स्वच्छ ब्लेडचाच वापर करा आणि जर तुम्हाला लांब काळासाठी केस-मुक्त आणि ग्लोइंग स्किन हवी असेल, तर वॅक्सिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे.दोन्ही पद्धती वापरण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चरायझर आणि नंतर सनस्क्रीन वापरल्यास त्वचा निरोगी आणि मऊ राहते.
advertisement
6/6
त्वचेला सुंदर ठेवणं म्हणजे फक्त ब्युटी नव्हे, तर आत्मविश्वासाची जाणीवही आहे. त्यामुळे वॅक्सिंग किंवा रेजर जे काही निवडाल, ते तुमच्या त्वचेला योग्य, सुरक्षित आणि सोयीस्कर असावं. स्वतःची काळजी घेणं हीच खरी सेल्फ-लव्ह आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Skin Care : Waxing की Razor केस हटवण्यासाठी योग्य पद्धत कोणती? महिलांनी काय करावं? इथे वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल