Health Risk Of The Day : फळं खाल्ल्यानंतर त्यावर पाणी प्यायल्याने काय होतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Drinking water after eat fruits : फळांवर पाणी पिणं किती योग्य आहे, प्यावं की नाही? त्याचा शरीरावर काय आणि कसा परिणाम होतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
1/7

काहीही खाल्लं की अनेकांना त्यावर पाणी पिण्याची सवय असते. पण फळात म्हणायला गेलं तर आधीच पाणी असतं. त्यामुळे फळांवर पाणी पिणं किती योग्य आहे, प्यावं की नाही? त्याचा शरीरावर काय आणि कसा परिणाम होतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
2/7
फळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने काय परिणाम होतो याबाबत रिसर्चही करण्यात आहेत. जर्नल ऑफ क्लिनिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी, डाइजेशन आणि जर्नल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.
advertisement
3/7
रिसर्चनुसार फळ खाऊन त्यावर लगेच पाणी प्यायल्याने पचनप्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो कारण पाणी पचन एन्झाइम पातळ करू शकतात.
advertisement
4/7
फळांवर लगेच पाणी प्यायल्याने अॅसिडीटीची समस्या वाढू शकते. विशेषतः जर फळं आम्लीय असतील तर ही शक्यता जास्त असते.
advertisement
5/7
रिसर्चनुसार फळं खाऊन त्यावर लगेच पाणी प्यायल्याने पचन आणि अॅसडिटी यावर नकारात्मक परिणाम होतो. हे परिणाम स्पष्टपणे समजण्यासाठी याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे.
advertisement
6/7
फळांवर पाणी पिण्याचे परिणाम व्यक्तीवरही अवलंबून असू शकतात. प्रत्येकावर याचा वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. तसंच पाणी पिण्याची वेळ, वैयक्तिक गरज, आरोग्य यावरही हे अवलंबून आहे.
advertisement
7/7
(सूचना : हा लेख माहितीसाठी देण्यात आला आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. न्यूज18मराठी कोणत्याही नुकसानीसाठी जबाबदार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : फळं खाल्ल्यानंतर त्यावर पाणी प्यायल्याने काय होतं?