TRENDING:

Narcissistic Behavior म्हणजे काय असतं? तुमचा पार्टनर देखील असा वागत असेल तर ही धोक्याची घंटा

Last Updated:
आपल्या जोडीदाराला कायम स्वतःचं महत्त्व सांगणं, दुसऱ्याला कमी लेखणं आणि सतत स्वतःच्या स्तुतीत रमणं असा त्याच्या स्वभाव असतो. पण हे सगळं 'नार्सिसिस्टिक' वर्तनाचं लक्षण असू शकतं.
advertisement
1/7
Narcissistic Behavior काय असतं? तुमचा पार्टनर असा वागत असेल तर ही धोक्याची घंटा
प्रेम, विश्वास, एकमेकांची काळजी आणि समजुतीवर उभं असलेलं नातं प्रत्येकासाठी खास असतं. पण सगळीच नाती सहज आणि सुरळीत चालतात असं नाही. नात्यात अनेक चढ उतार येत असतात. याचा परिणाम असा की कधीकधी लोक दुरावतात.
advertisement
2/7
कधी कधी नात्यात असा एक व्यक्ती असतो, ज्याला स्वतःविषयीच जास्त आकर्षण असतं. ज्याला वाटतं की जग फक्त त्याच्या भोवती फिरतंय. आपल्या जोडीदाराला कायम स्वतःचं महत्त्व सांगणं, दुसऱ्याला कमी लेखणं आणि सतत स्वतःच्या स्तुतीत रमणं असा त्याच्या स्वभाव असतो. पण हे सगळं 'नार्सिसिस्टिक' वर्तनाचं लक्षण असू शकतं.
advertisement
3/7
'नार्सिसिस्ट' म्हणजे नेमकं काय?'नार्सिसिस्ट' (Narcissist) हा असा व्यक्ती असतो, जो स्वतःलाच सर्वोत्तम समजतो, इतरांपेक्षा श्रेष्ठ मानतो आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःचं महत्त्व वाढवतो. अशा व्यक्तींना दुसऱ्यांकडून स्वत:ची प्रशंसा हवी असते, केंद्रस्थानी राहणं आवडतं आणि जर असं झाल नाही तर ते चिडतात, रागावतात किंवा खोट्या सहानुभूती मिळवण्यासाठी काहीही गोष्टी सांगू शकतात.
advertisement
4/7
जोडीदार नार्सिसिस्ट असेल तर काय करावं?नात्यात असं वर्तन फार त्रासदायक ठरू शकतं. जर तुमचा जोडीदार नार्सिसिस्टिक वागणूक देत असेल, तर खालील टिप्स तुमच्यासाठी फायद्याच्या असू शकतात.
advertisement
5/7
आपल्या जोडीदारासोबत मोकळेपणाने बोला. त्याला स्पष्ट करा की तुम्ही कोणत्या गोष्टी स्वीकारू शकता आणि कोणत्या नाही. खुलं संवाद ठेवा, त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा, पण त्याचवेळी त्याला याची जाणीव करुन द्या की तुमचंही अस्तित्व आणि गरजा महत्त्वाच्या आहेत.
advertisement
6/7
स्वतःचा आत्मसन्मान जपा: नार्सिसिस्ट पार्टनर अनेकदा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करेल. अशा वेळी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी ठाम उभं राहणं गरजेचं आहे.जर परिस्थिती अधिक बिकट झाली असेल आणि तुम्हाला मानसिक तणाव वाटत असेल, तर प्रोफेशनल सायकोलॉजिस्ट किंवा रिलेशनशिप थेरपिस्टची मदत घ्या.
advertisement
7/7
नार्सिसिस्ट असणं नॉर्मल आहे का?नाही. हे 'नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर' (NPD) म्हणून ओळखलं जातं. ही एक मानसिक स्थिती आहे. या प्रकारात व्यक्तीला जास्त आत्मकेंद्रीपणा, सतत स्तुतीची गरज आणि सहानुभूतीची कमतरता दिसून येते. त्यामुळे त्यांच्या जवळच्या व्यक्तींना मोठा मानसिक ताण येऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Narcissistic Behavior म्हणजे काय असतं? तुमचा पार्टनर देखील असा वागत असेल तर ही धोक्याची घंटा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल