TRENDING:

Powder Room : बाथरूम, वॉशरूम, रेस्टरूम माहिती असेल पण पावडर रूमबाबत ऐकलंय का, कशासाठी होतो वापर?

Last Updated:
Toilet Different Name : तुम्ही बाथरूम आणि वॉशरूम हे शब्द वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले पाहिले असतील. जरी सामान्य भाषेत त्यांना फक्त शौचालये म्हणतात. पण तुम्हाला या शौचालयांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे देण्यामागील कारण माहित आहे का?
advertisement
1/7
बाथरूम, वॉशरूम, रेस्टरूम माहितीये पण पावडर रूमबाबत ऐकलंय का, कशासाठी होतो वापर?
बाथरूम, वॉशरूम, रेस्टरूम हे शब्द आपल्यासाठी दररोजचे झाले आहेत. टॉयलेटला असलेली ही वेगवेगळी नावं. त्यांचा उपयोगही तसा वेगळा आहे. यात आता आणखी एका शब्दाची भर पडली आहे ती म्हणजे पावडर रूम.
advertisement
2/7
पावडर रूम नाव वाचूनच तुम्हाला अजब वाटलं असेल. पावडर रूम काय आहे, याचा काय वापर? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील.
advertisement
3/7
आपण आपल्या घरातील शौचालयाला बाथरूम म्हणतो, जरी बाथटब नसला तरीही. बाथरूम म्हणजे अंघोळीची जागा. फक्त शौचालय असेल आणि आंघोळीची जागा नसेल, तर त्याला बाथरूम म्हणणं तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे. भारतात बहुतेक घरांमध्ये अंघोळ करतात त्याच ठिकाणी शौचालय बांधलेलं असतं. म्हणूनच आपण त्याला बाथरूम म्हणतो.
advertisement
4/7
वॉशरूम म्हणजे जिथं फक्त हात आणि चेहरा धुण्यासाठी जागा आहे. ऑफिस, शाळा आणि कारखान्यात वॉशरूम हा शब्द अनेकदा वापरला जातो कारण तिथे बाथटब नसतात, फक्त बेसिन आणि शौचालयं असतात.
advertisement
5/7
रेस्टरूम म्हणजे विश्रांती घेण्याची जागा. 1900 च्या दशकात अमेरिकेतील लोकांना टॉयलेट हा शब्द बोलायला लाज वाटत होती. म्हणून दुकानदारांनी रेस्टरूम असं लिहिलं, म्हणजे विश्रांती घ्या. त्यामुळे मॉल, रेस्टॉरंट्स आणि थिएटरमध्ये अजूनही रेस्टरूम वापरला जातो.
advertisement
6/7
लेवोरेटरी हा लॅटिन शब्द लॅवरपासून आला आहे ज्याचा अर्थ धुणं असा होतो. हा शब्द विमानं आणि ट्रेनमध्ये वापरला जातो. फ्लाइटमध्ये कमी जागा असते म्हणून त्यासाठी लेवोरेटरी हा लहान आणि अधिक औपचारिक शब्द वापरला जातो.
advertisement
7/7
पावडर रूम जिथं महिला त्यांचा मेकअप ‘पावडर’ करतात. अठराव्या शतकात श्रीमंत घरातील महिला पार्टीला गेल्यावर बाथरूममध्ये जाऊन मेकअप करायच्या म्हणून ते पावडर रूम म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आज फॅन्सी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समधील महिलांच्या टॉयलेटव पावडर रूम लिहिलं जातं, जेणेकरून ते अधिक क्लासी वाटावेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Powder Room : बाथरूम, वॉशरूम, रेस्टरूम माहिती असेल पण पावडर रूमबाबत ऐकलंय का, कशासाठी होतो वापर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल