TRENDING:

Ghee : कोलेस्ट्रॉल वाढवणारं तूप कोणतं, गाईचं की म्हशीचं? तुम्हीही चुकीचं घी खात असाल, तर होईल नुकसान

Last Updated:
भारतीय आहारात तुपाचे महत्त्व खूप आहे. चपातीला लावण्यासाठी असो किंवा डाळीला फोडणी देण्यासाठी, तूप हा अविभाज्य घटक आहे. मात्र, गायीचे तूप आणि म्हशीचे तूप यापैकी कोणते आरोग्यासाठी अधिक चांगले.
advertisement
1/7
कोलेस्ट्रॉल वाढवणारं तूप कोणतं, गाईचं की म्हशीचं? खाण्यापूर्वी नक्की वाचा
भारतीय आहारात तुपाचे महत्त्व खूप आहे. चपातीला लावण्यासाठी असो किंवा डाळीला फोडणी देण्यासाठी, तूप हा अविभाज्य घटक आहे. मात्र, गायीचे तूप आणि म्हशीचे तूप यापैकी कोणते आरोग्यासाठी अधिक चांगले आणि कशात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते, हा प्रश्न अनेकांना पडतो. या दोन प्रकारच्या तुपात नेमके काय फरक आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
advertisement
2/7
रंग आणि पोत: गायीचे तूप पिवळसर रंगाचे असते आणि त्याचा पोत हलका असतो. तर म्हशीचे तूप पांढरे, घट्ट आणि अधिक क्रीमयुक्त असते.
advertisement
3/7
फॅट प्रमाण: म्हशीच्या तुपात फॅटचे प्रमाण (साधारण 7-8%) जास्त असते, तर गायीच्या तुपात ते (साधारण 3-4%) कमी असते. यामुळे म्हशीच्या तुपात कॅलरी जास्त असतात.
advertisement
4/7
कोलेस्टेरॉलची पातळी: आश्चर्य वाटेल, पण म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या तुपात गायीच्या तुपाच्या तुलनेत कोलेस्टेरॉलचे प्रमाण किंचित कमी असते.
advertisement
5/7
पचनास सुलभता: गायीचे तूप पचनास हलके असते, त्यामुळे ते लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांसाठी अधिक उपयुक्त मानले जाते. म्हशीचे तूप जड असल्याने पचायला वेळ लागतो.
advertisement
6/7
पोषक घटक: गायीच्या तुपात व्हिटॅमिन ए (A), डी (D), ई (E) आणि के (K) अधिक प्रमाणात आढळतात. तर म्हशीच्या तुपात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते.
advertisement
7/7
वजन आणि ऊर्जा: वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी गायीचे तूप चांगले मानले जाते, कारण त्यात फॅट कमी असते. ज्यांना वजन वाढवायचे आहे किंवा खूप शारीरिक श्रम करतात, त्यांच्यासाठी म्हशीचे तूप अधिक ऊर्जा आणि ताकद देते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ghee : कोलेस्ट्रॉल वाढवणारं तूप कोणतं, गाईचं की म्हशीचं? तुम्हीही चुकीचं घी खात असाल, तर होईल नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल