कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पडतं टक्कल? 'या' पोषक तत्त्वाची कमतरता लगेच भरून काढा, अन्यथा...
- Published by:Devika Shinde
Last Updated:
केसांचे आरोग्य आपल्या शरीरातील पोषणावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. विशेषतः, काही जीवनसत्त्वे (Vitamins) केसांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
advertisement
1/9

आजच्या धकाधकीच्या जीवनात केस गळणे (Hair Fall) आणि टक्कल पडणे (Baldness) ही एक सामान्य समस्या बनली आहे. चुकीची जीवनशैली, वाढते प्रदूषण, तणाव आणि असंतुलित आहार यामुळे अनेक तरुणही या समस्येचा सामना करत आहेत.
advertisement
2/9
बऱ्याचदा आपण केवळ बाहेरील उपचारांवर लक्ष केंद्रित करतो, ज्यामध्ये स्पा करणे, केरटिन ट्रिटमेंट करणं, केस स्ट्रेट करणं, स्मुथनिंग करणं यांसारखे ट्रिटमेंट असतात. पण हे विसरतो की केसांचे आरोग्य आपल्या शरीरातील पोषणावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. विशेषतः, काही जीवनसत्त्वे (Vitamins) केसांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
advertisement
3/9
टक्कल पडण्यामागचं मुख्य कारण: बायोटिनची कमतरताकेसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या जीवनसत्त्वांपैकी एक म्हणजे बायोटिन (Biotin), ज्याला व्हिटॅमिन बी7 (Vitamin B7) असेही म्हणतात. miiskin.com या प्रतिष्ठित वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, बायोटिन हे शरीरातील केराटिन (Keratin) नावाच्या प्रथिनाच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. केराटिन हेच प्रथिन आपले केस, नखे आणि त्वचेला मजबूत आणि निरोगी ठेवते.
advertisement
4/9
बायोटिनची कमतरता झाल्यास काय होते?शरीरात बायोटिनची कमतरता झाल्यास त्याचे थेट परिणाम केसांवर दिसू लागतात.
advertisement
5/9
केस गळणे: बायोटिनच्या कमतरतेमुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात.केस पातळ होणे: केसांचा नैसर्गिक पोत कमी होऊन ते पातळ दिसू लागतात.केस तुटणे: केस नाजूक झाल्यामुळे ते सहज तुटतात.टक्कल पडण्याचा धोका: ही कमतरता जास्त काळ राहिल्यास, पुरुषांमध्ये लवकर टक्कल पडण्याचा धोका वाढतो.
advertisement
6/9
बायोटिनची कमतरता कशी भरून काढाल?बायोटिनची कमतरता टाळण्यासाठी किंवा ती भरून काढण्यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
advertisement
7/9
या पदार्थांचा आहारात समावेश करा:अंडी: विशेषतः अंड्याचा पिवळा भाग (Egg Yolk) बायोटिनचा उत्तम स्रोत आहे.सुकामेवा (Dry Fruits): बदाम आणि अक्रोड यांसारख्या सुकामेव्यामध्ये बायोटिन भरपूर प्रमाणात असते.दूध आणि दुग्धजन्य पदार्थ: दूध, दही, पनीर यांसारख्या पदार्थांमधूनही बायोटिन मिळते.केळी (Banana): केळीमध्येही बायोटिनचे चांगले प्रमाण असते.मांस आणि मासे (Meat and Fish): मांसाहारी लोकांसाठी चिकन, मासे (विशेषतः सॅल्मन) हे बायोटिनचे उत्कृष्ट स्रोत आहेत.
advertisement
8/9
केवळ बाह्य उपचार पुरेसे नाहीत!जर तुम्हाला विनाकारण केस गळतीचा अनुभव येत असेल, तर केवळ महागडे तेल किंवा शॅम्पू बदलण्याऐवजी, तुमच्या आहाराकडे आणि शरीरातील पोषक तत्वांकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. बायोटिनची कमतरता दूर करण्यासाठी योग्य आहार आणि गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने बायोटिन सप्लीमेंट्स (Supplements) घेणे फायदेशीर ठरू शकते. तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी योग्य पोषण हाच खरा उपाय आहे.
advertisement
9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पडतं टक्कल? 'या' पोषक तत्त्वाची कमतरता लगेच भरून काढा, अन्यथा...