TRENDING:

Green Peas : मटारला 'ग्रीन गोल्ड' का म्हणतात? फक्त चवच नाही तर यामागची कारणं विचार करायला लावतील

Last Updated:
मटारला हे मानाचं स्थान का मिळालं आहे? त्यामागे केवळ त्याची चव नसून काही महत्त्वाची आर्थिक आणि वैज्ञानिक कारणं आहेत. चला तर मग, या 'हिरव्या सोन्याचे' रहस्य उलगडूया.
advertisement
1/6
मटारला 'ग्रीन गोल्ड' का म्हणतात? चवच नाही तर यामागची कारणं विचार करायला लावतील
हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला की बाजारात हिरवेगार, टपोरे मटार दिसू लागतात. मटार कचोरी असो किंवा मटार पनीर, या भाजीशिवाय हिवाळ्याचा बेत अपूर्णच वाटतो. पण तुम्हाला माहिती आहे का? कृषी क्षेत्रात आणि आहारशास्त्रामध्ये मटारला केवळ एक भाजी न मानता 'ग्रीन गोल्ड' (Green Gold) म्हणजेच 'हिरवं सोनं' असं म्हटलं जातं.
advertisement
2/6
मटारला हे मानाचं स्थान का मिळालं आहे? त्यामागे केवळ त्याची चव नसून काही महत्त्वाची आर्थिक आणि वैज्ञानिक कारणं आहेत. चला तर मग, या 'हिरव्या सोन्याचे' रहस्य उलगडूया.
advertisement
3/6
मटारला 'हिरवं सोनं' म्हणण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे त्यातून मिळणारा नफा. मटार हे कमी कालावधीत येणारं पीक आहे. साधारण 60 to 80 दिवसांत हे पीक हाती येतं. कमी कष्ट आणि कमी गुंतवणुकीत शेतकरी यातून चांगला नफा कमावतात. जेव्हा बाजारात हंगामाच्या सुरुवातीला मटार येतात, तेव्हा त्यांचे दर गगनाला भिडलेले असतात, म्हणूनच हे पीक शेतकऱ्यांसाठी सोन्यासारखे मौल्यवान ठरते.
advertisement
4/6
जमिनीचा कस वाढवणारे 'नॅचरल फर्टिलायझर'मटार हे कडधान्य वर्गातील (Legumes) पीक आहे. विज्ञानाच्या दृष्टीने हे पीक जमिनीसाठी अत्यंत फायदेशीर असते. मटारच्या मुळांवर असणाऱ्या गाठी हवेतील नायट्रोजन जमिनीत शोषून घेतात (Nitrogen Fixation). यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि पुढच्या पिकासाठी जमीन अधिक सुपीक होते. म्हणजेच, हे पीक शेतात लावल्याने खताचा खर्च वाचतो, जे सोन्यासारखंच फायद्याचं आहे.
advertisement
5/6
आरोग्याचा खजिना (Nutritional Value)आहारशास्त्रात मटारला 'ग्रीन गोल्ड' म्हणण्याचं कारण म्हणजे त्यातील पोषक तत्वे. मटारमध्ये Proteins, Vitamins (A, C, K) आणि Fiber भरपूर प्रमाणात असतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी मटार अत्यंत गुणकारी मानले जातात. कमी कॅलरीज आणि जास्त पोषण यामुळे आरोग्यप्रेमींसाठी हे 'सुपरफूड' आहे.
advertisement
6/6
वर्षभर मागणी आणि प्रक्रिया उद्योगमटार केवळ हिवाळ्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. 'फ्रोजन वाटाणा' (Frozen Peas) मुळे याला वर्षभर मागणी असते. प्रक्रिया उद्योगामध्ये (Processing Industry) मटारला मोठी मागणी असल्याने मोठी आर्थिक उलाढाल होते. साठवणूक करून ते वर्षभर विकता येतात, ज्यामुळे त्यांची किंमत टिकून राहते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Green Peas : मटारला 'ग्रीन गोल्ड' का म्हणतात? फक्त चवच नाही तर यामागची कारणं विचार करायला लावतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल