Viral : वयाच्या 5 व्या वर्षी 'ती' बनली आई! खेळण्या-बागडण्याच्या वयात निसर्गाचा हा कोणता चमत्कार? वैद्यकीय विश्वाला हादरवणारी सत्य कथा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
वैद्यकीय इतिहासात अशी एक घटना नोंदली गेली आहे, जिने 1939 साली संपूर्ण जगाला आणि डॉक्टरांनाही कोड्यात टाकले होते. ही कथा आहे जगातील सर्वात तरुण आईची.
advertisement
1/10

निसर्गाचा एक नियम आहे. मानवी शरीराचा विकास एका विशिष्ट क्रमाने होत असतो. बालपण, मग तारुण्य आणि त्यानंतर प्रौढावस्था. सर्वसाधारणपणे, लग्नासाठी आणि आई होण्यासाठी शरीराची आणि मनाची तयारी होणे आवश्यक असते, ज्याला आपण योग्य वय म्हणतो. जर 18 किंवा 20 वर्षांच्या आधी गर्भधारणा झाली, तर आपण त्याला खूप लवकर मानतो आणि त्यात अनेक वैद्यकीय गुंतागुंती असतात.
advertisement
2/10
पण, विचार करा... ज्या वयात मुली बाहुलीशी खेळतात, शाळेत जाण्यासाठी रडतात किंवा अंगणात बागडतात, त्या वयात एखादी मुलगी गरोदर राहू शकते का? हे ऐकूनच अंगावर काटा येईल, पण वैद्यकीय इतिहासात अशी एक घटना नोंदली गेली आहे, जिने 1939 साली संपूर्ण जगाला आणि डॉक्टरांनाही कोड्यात टाकले होते. ही कथा आहे जगातील सर्वात तरुण आईची.
advertisement
3/10
ही घटना आहे पेरू (Peru) देशातील. लीना मदिना (Lina Medina) असे या चिमुरडीचे नाव. 14 मे 1939 रोजी, जेव्हा लीनाचे वय अवघे 5 वर्षे 7 महिने आणि 21 दिवस होते, तेव्हा तिने एका सुदृढ मुलाला जन्म दिला.
advertisement
4/10
सुरुवातीला लीनाच्या पोटाचा आकार वाढू लागल्याने तिच्या पालकांना वाटले की तिच्या पोटात गाठ झाली असावी. ते तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. पण तपासणीनंतर डॉक्टरांनी जे सांगितले, त्यावर कोणाचाच विश्वास बसेना. लीना 7 महिन्यांची गरोदर होती, सिझेरियन सेक्शनद्वारे तिने मुलाला जन्म दिला आणि ती जगातील सर्वात तरुण आई बनली.
advertisement
5/10
हे कसे शक्य झाले?एवढ्या लहान वयात हे कसे शक्य आहे, यावर जगभरातील तज्ज्ञांनी अभ्यास केला. डॉक्टरांच्या मते, लीनाला प्रिकॉशियस प्यूबर्टी नावाचा दुर्मिळ विकार होता. याचा अर्थ असा की, तिचे शरीर वयाच्या मानाने खूप आधीच परिपक्व झाले होते.
advertisement
6/10
अहवालानुसार, लीनाला वयाच्या अवघ्या आठव्या महिन्यापासून मासिक पाळी (Periods) सुरू झाली होती (काही अहवालानुसार वयाच्या तिसऱ्या वर्षापासून). वयाच्या चौथ्या वर्षी तिचे शरीर पूर्णपणे विकसित झाले होते आणि हार्मोनल बदलांमुळे ओव्हुलेशन (बीजांड निर्मिती) सुरू झाले होते. अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट सारख्या संस्थांनी या प्रकरणाची पुष्टी केली असून, ही गर्भधारणा खरी असल्याचे सिद्ध झाले आहे.
advertisement
7/10
लीनाने ज्या मुलाला जन्म दिला, त्याचे नाव गेरार्डो ठेवण्यात आले. सर्वात हृदयद्रावक गोष्ट म्हणजे, गेरार्डोला लहानाचा मोठा होईपर्यंत हेच वाटत होते की लीना त्याची मोठी बहीण आहे. वयाच्या 10 व्या वर्षी त्याला समजले की लीना त्याची बहीण नसून आई आहे. दुर्दैवाने, 1979 मध्ये वयाच्या 40 व्या वर्षी हाडांच्या कर्करोगामुळे गेरार्डोचा मृत्यू झाला.
advertisement
8/10
चमत्काराच्या मागचे काळे सत्य तो कोण होता?वैद्यकीयदृष्ट्या लीनाचे शरीर आई बनण्यासाठी तयार झाले होते, पण ती एक लहान मुलगीच होती. मग हे घडले कसे? यात एका भयानक गुन्ह्याची शक्यता वर्तवली गेली. लीना गरोदर असल्याचे समजताच पोलिसांनी तिच्या वडिलांना यौन शोषणाच्या (Sexual Abuse) संशयावरून अटक केली होती.
advertisement
9/10
लीनाने कधीच सांगितले नाही की मुलाचा पिता कोण होता किंवा तिच्यासोबत काय घडले होते. तिने आयुष्यभर या विषयावर मौन पाळल. हे रहस्य आजही कोणाला उलगडलेले नाही.
advertisement
10/10
लीना मदिना यांनी नंतर सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी डॉ. लोज़ाडा यांच्या दवाखान्यात सेक्रेटरी म्हणून काम केले, ज्यांनी त्यांची प्रसूती केली होती. 1972 मध्ये त्यांनी लग्न केले आणि दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्या आपल्या पतीसोबत पेरूच्या लिटल शिकागो भागात राहत होत्या. ही घटना आजही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात आश्चर्यकारक आणि तितकीच दुर्दैवी घटना मानली जाते, जिथे निसर्गाचा एक दुर्मिळ आजार आणि सामाजिक गुन्ह्याची सावली एका चिमुरडीच्या आयुष्यावर पडली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Viral : वयाच्या 5 व्या वर्षी 'ती' बनली आई! खेळण्या-बागडण्याच्या वयात निसर्गाचा हा कोणता चमत्कार? वैद्यकीय विश्वाला हादरवणारी सत्य कथा