चप्पल खरेदीची हौस होईल पूर्ण; मुंबईतील सर्वात स्वस्त बाजारात खरेदी करा फक्त 65 रुपयांत
- Published by:News18 Marathi
Last Updated:
रोज वापरात लागणारी गोष्ट म्हणजे चप्पल आणि शूज. त्यामुळे तुम्हाला मुंबईत स्वस्तात चप्पल आणि शूजची खरेदी कुठे करता येईल याबद्दलच माहिती सांगणार आहोत.
advertisement
1/7

रोजच्या जीवनात आपण अनेक वस्तूंचा वापर करतो. त्यापैकी रोज वापरात लागणारी गोष्ट म्हणजे चप्पल आणि शूज. त्यामुळे वेगवगेळ्या प्रकारच्या चप्पल आणि शूजची खरेदी केली जाते. यासाठी बऱ्याच वेळा स्वस्त मार्केटचा शोधला घेतला जातो. त्यामुळे तुम्हाला <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईत</a> स्वस्तात चप्पल आणि शूजची खरेदी कुठे करता येईल याबद्दलच माहिती सांगणार आहोत.
advertisement
2/7
कुर्ल्यातील ठक्कर बाप्पा लाईन म्हणजे मुंबईतील चप्पल आणि शूजचं सगळ्यात स्वस्त मार्केट म्हणून ओळखलं जात. या मार्केटमध्ये चप्पली आणि शूजची जवळपास 60 ते 70 दुकानं आहेत.
advertisement
3/7
या दुकानांमध्ये फक्त होलसेल चप्पल आणि शूज तुम्हाला पाहायला मिळतील. या मार्केटमधील दुकानांमध्ये चप्पलची किंमत फक्त 65 रुपयांपासून सुरु होते. ठक्कर बाप्पा मार्केटमध्ये रोज हजारो चप्पलांचा माल मुंबईतील इतर बड्या मार्केटमध्ये नेला जातो.
advertisement
4/7
साधी चप्पल घ्यायची असेल तर त्याची किंमत 65 रुपयांपासून सुरु होते. सॉफ्ट स्पंज चप्पल घ्यायच्या असतील तर त्यांची किंमत 100 रुपयांपासून सुरु होते. मोती आणि डायमंडचं काम असलेली म्हणजे भरजरी वर्क असलेली चप्पलची किंमत 300 रुपयांपासून सुरु होते.
advertisement
5/7
डिझाईनरमध्ये कोल्हापूरी चप्पलचेही अनेक पॅटर्न पाहायला मिळतात. या कोल्हापूरी चप्पलची किंमत 220 रुपयांपासून सुरु होते. डिझाईनर शूजची किंमत 200 ते 300 रुपयांपर्यंत आहे. ऑफिस वेअर शुजची किंमत 200 ते 300 रुपयांपर्यंत आहे.
advertisement
6/7
दरम्यान या मार्केटमधील प्रत्येक दुकानात फक्त होलसेलमध्येच चप्पल विकत घेता येऊ शकते. इथे डिझाईनर चप्पलही स्वस्त दरात मिळत असल्यानं फायदा नक्कीच होऊ शकतो.
advertisement
7/7
डिझाईनर चप्पल किंवा सॅंडलची किंमत दुसऱ्या मार्केटमध्ये पाहायला गेलं तर जवळपास 700 ते 1000 रुपयांच्या घरात असते. तिच चप्पल तुम्हाला ठक्कर बाप्पा गल्लीत फक्त 300 रुपयांना मिळते. त्यामुळे जर तुम्हाला व्यवसाय सोडून शॉपिंग जरी करायचं असेल आणि तुम्हाल जर चप्पलांचे एकापेक्षा जास्त जोड घ्यायचे असतीलतर तुमच्यासाठी ठक्कर बाप्पा मार्केट हे उत्तम ठिकाण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
चप्पल खरेदीची हौस होईल पूर्ण; मुंबईतील सर्वात स्वस्त बाजारात खरेदी करा फक्त 65 रुपयांत