TRENDING:

Newlyweds, सगळे जातात तिथे कसलं Honeymoon? तुम्ही 'हे' ठिकाण करा Explore

Last Updated:
Honeymoon Destinations: तुमचं लग्न ठरलं असेल किंवा नुकतंच लग्न झालं असेल आणि तुम्ही हनिमूनसाठी बेस्ट डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्याचसाठी आहे. आपला भारत देश नैसर्गिक सौंदर्याने संपन्न आहे. इथे कुठल्याही कोपऱ्यात गेलं तरी मन प्रसन्न होतं. मात्र तुम्हाला हनिमूनसाठी प्रसिद्ध नाही पण प्रचंड रोमँटिक आहे, अशा ठिकाणी जायचं असेल तर पाहूया एक लय भारी जागा. (फोटो: जयमित्र बिष्ट)
advertisement
1/5
सगळे जातात तिथे कसलं Honeymoon? तुम्ही 'हे' ठिकाण करा Explore
उत्तराखंड नैसर्गिकदृष्ट्या प्रचंड सुंदर आहे. इथल्या अल्मोडापासून जवळपास 53 किलोमीटर अंतरावर कौसानी ठिकाण आहे. या ठिकाणाला इतकं सुरेख सौंदर्य लाभलंय की, ते स्वित्झर्लंड म्हणूनही ओळखलं जातं. हे ठिकाण पाहायला देश-विदेशातून पर्यटक येतात. इथे आपलं हनिमून निश्चितच अविस्मरणीय ठरेल.
advertisement
2/5
अल्मोडापासून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर बिनसर अभयारण्य आहे. अभयारण्य म्हणजे केवळ प्राणी पाहायला ही जागा नाही, तर इथे होणाऱ्या बर्फवृष्टीत आपण आपला हनिमून उत्तमरित्या साजरा करू शकता. एकीकडे बर्फवृष्टी आणि दुसरीकडे रोमँटिक वातावरण अशी काहीशी इथली परिस्थिती असते, शिवाय मनाला वाटेल तेव्हा आपण इथे जंगल सफारी करू शकता. 
advertisement
3/5
तुम्ही खरोखर हनिमूनसाठी अल्मोडाला जात असाल तर राणीच्या शेतात जायला विसरू नका. तिथे तुम्हाला जगातलं सर्वात मोठं गोल्फ मैदान पाहायला मिळेल. शिवाय तिथे राणी तलाव, चौबटिया गार्डन, झूला देवी मंदिरसुद्धा आहे. जिथे आपण जोडीने जाऊ शकता. 
advertisement
4/5
अल्मोडाच्या कसार देवी मंदिरात आपण जोडीने दर्शन घेऊ शकता. हे जागरूक देवस्थान आहे, इथे देश-विदेशातून पर्यटक दर्शनाला येतात. शिवाय याठिकाणी राहण्यासाठी हॉटेल, रिसॉर्ट, होम स्टे, मडहाऊस असे अनेक पर्याय आपल्याला मिळतील. तसंच निसर्गाचं मनमोहक सौंदर्य आपण पाहू शकाल.
advertisement
5/5
अल्मोडा हे हनिमूनसाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या सुविधा मिळतील. सकाळी विविध मंदिरांमध्ये दर्शन घेऊन, दिवसभर निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवून, शॉपिंग करून, बर्फवृष्टीचा अनुभव घेऊन संध्याकाळचा सुंदर सुर्यास्त आपण अनुभवू शकाल आणि रात्र ही पूर्णपणे आपलीच असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Newlyweds, सगळे जातात तिथे कसलं Honeymoon? तुम्ही 'हे' ठिकाण करा Explore
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल