आवडत नसली तरी कुळीथ डाळ फायदेशीर! किडनी स्टोन करते झटपट दूर
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
शरिराला प्रथिनं देण्यासाठी अनेकजण तूर डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, चणा डाळ यांसारख्या डाळींचं सेवन करतात. पण तुम्हाला कुळीथाच्या डाळीचे फायदे माहित आहेत का? ही डाळ फारशी प्रसिद्ध नसल्यामुळे बहुतेक लोकांना तिचे फायदे माहित नसतात.
advertisement
1/5

कुळीथाची डाळ ही केवळ प्रथिनांचा उत्तम स्रोत नाही तर, अनेक गंभीर आजारांशी लढण्यासाठीदेखील उपयुक्त आहे. गडद तपकिरी रंगाची असल्याने ही डाळ थोडीशी मसूराच्या डाळीसारखी दिसते.
advertisement
2/5
कुळीथाच्या डाळीमध्ये पौष्टिक गुणधर्मांसह रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचाही गुण आहे. शिवाय हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ही डाळ आहारात समाविष्ट करणं फायदेशीर ठरतं.
advertisement
3/5
कुळीथ डाळ शरिरातील LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून HDL म्हणजेच चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. तसंच कुळीथ नेहमीच्या आहारात असेल तर ऋतूबदलासह होणाऱ्या आजारांच्या समस्याही कमी होतात.
advertisement
4/5
कुळीथाच्या डाळीमध्ये भरपूर फायबर आढळतं. यामुळेच या डाळीचं सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यासारख्या समस्या दूर होतात.
advertisement
5/5
ज्यांना किडनी स्टोनचा त्रास असेल, त्यांनी आहारात कुळीथ डाळीचा समावेश आवर्जून करावा. त्यामुळे खडे हळूहळू नैसर्गिकरित्या पोटाबाहेर जाण्यास मदत मिळते. आपला किडनी स्टोनचा त्रास पूर्णपणे बरादेखील होऊ शकतो.