TRENDING:

Sai Baba : साईचरणी तब्बल 1 कोटीचे एक्स-रे मशीन दान; कोण आहेत साईभक्त राजीव मलिक?

Last Updated:
Sai Baba : श्री साईबाबा संस्‍थानचे श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालयाला मायलॉन लॅब्रेाटरीज यांचेकडून मोठी देणगी देण्यात आली आहे. (हरीष दिमोटे, प्रतिनिधी)
advertisement
1/5
साईचरणी तब्बल 1 कोटीचे एक्स-रे मशीन दान; कोण आहेत साईभक्त राजीव मलिक?
शिर्डी साईबाबांच्या झोळीमध्ये देश विदेशातील साई भक्त भरभरून दान करत असतात. मंगळवारी एका साई भक्ताने साई चरणी मोठे दान करत साईबाबा संस्थानच्या रुग्णालयाला एक कोटी रुपयांचे एक्स-रे मशीन दान स्वरूपात दिले आहे. या दानामुळे साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा घेता येणार आहे.
advertisement
2/5
साईनाथ रुग्‍णालयाच्‍या एक्‍स रे विभागाकरीता मायलॉन लॅब्रोटरीज यांचेकडून एकुण 1 कोटी 15 लाख रूपये किंमतीचे दोन अद्यावत एक्‍स-रे मशिन देणगी स्‍वरुपात प्राप्‍त झाले आहे. साईभक्त राजीव मलिक यांचे हस्‍ते मशिनची पुजा करण्यात आली. या दानामुळे रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांना मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती साईमंदिराचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
advertisement
3/5
सदर मशीन श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रूग्‍णालयाच्‍या एक्‍स-रे विभागात बसविण्‍यात येऊन त्‍यांची मायलॉन कंपनीचे अध्‍यक्ष राजीव मलिक व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सिमा मलिक यांचे हस्‍ते पुजा करुन उदघाटन करण्‍यात आले.
advertisement
4/5
यानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्‍ते देणगीदार साईभक्‍त श्री राजीव मलिक व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सिमा मलिक यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी मायलॉन कंपनीचे व्‍यवस्‍थापक जितेंद्र खैरे, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकिय संचालक डॉ. प्रितम वडगावे, वैद्यकिय अधिक्षीक डॉ. मैथिली पितांबरे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, अधिसेविका मंदा थोरात, नजमा सय्यद, बायोमेडीकल विभागाचे इंजिनिअर राजेश वाकडे, तुषार कुटे, श्रध्‍दा कोते व स्‍टोअर किपर सुनिल निकम आदी उपस्थित होते.
advertisement
5/5
मायलॉन लॅब्रेाटरीज कंपनीच्‍या वतीने संस्‍थान रूग्‍णालयाकरीता यापुर्वी सुमारे 1 कोटीहून अधिक किंमतीच्‍या विविध मशिनरी व अॅम्‍बुलन्‍स देणगी स्‍वरुपात मिळाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Sai Baba : साईचरणी तब्बल 1 कोटीचे एक्स-रे मशीन दान; कोण आहेत साईभक्त राजीव मलिक?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल