Farmer Protest : शेतकऱ्यांचा हिसका, ट्रॅक्टरची ट्रॉलीभरून शेण ओतलं रस्त्यावर PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Farmer Protest : अकोले तालुक्यातील कोतूळ येथून निघालेला ट्रॅक्टर मार्च संगमनेरमध्ये धडकला. दुधाला 40 रुपये हमीभावासाठी शेतकरी आक्रमक.
advertisement
1/6

गेल्या काही दिवसांपासून दूध दरवाढी शेतकरी विविध ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोतूळ गावातून दूध दराच्या मागणीसाठी निघालेला ट्रॅक्टर मोर्चा संगमनेर शहरात पोहचला आहे.
advertisement
2/6
शेकडो ट्रॅक्टरसह मोर्चात सहभागी झालेले शेतकरी दुधाला किमान चाळीस रूपये भाव द्या, दुधाला एफआरपी लागू करा या मागण्यासह आक्रमक झाले आहेत.
advertisement
3/6
गेल्या 18 दिवसापासून अकोले तालुक्यातील कोतूळ गावात सुरू असलेल्या उपोषणाची दखल सरकारने न घेतल्याने आज सर्व पक्षीय नेत्यांसह शेतकऱ्यांनी संगमनेर प्रान्त कार्यालयावर मोर्चा काढला होता.
advertisement
4/6
संगमनेर शहरात मोर्चा पोहचल्यानंतर आंदोलकांनी शासकीय कार्यालयासमोर शेण ओतून सरकारचा निषेध केलाय.
advertisement
5/6
प्रांत कार्यालयासमोर निघालेला मोर्चा पोलिसांनी संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहासमोर अडवला. शेकडो ट्रॅक्टरसह शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले पाहायला मिळाले.
advertisement
6/6
ट्रॅक्टर मार्चमुळे संगमनेर शहरात वाहतूक वळवण्यात आली. मोर्चा सांभाळताना पोलीस प्रशासनाचीही दमछाक झाली. शेतकऱ्यांनी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Farmer Protest : शेतकऱ्यांचा हिसका, ट्रॅक्टरची ट्रॉलीभरून शेण ओतलं रस्त्यावर PHOTOS