पाण्याच्या शोधात पडला रक्ताचा सडा, मृतदेहांचे उडाले तुकडे, अहमदनगरमधली घटना
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अहमदनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे, विहिरीचं खोदकाम सुरू असताना जिलेटीनचा भीषण स्फोट झाला आहे.
advertisement
1/7

अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, विहिरीचं खोदकाम सुरू असताना जिलेटीनचा स्फोट झाला, या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
advertisement
2/7
अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळी या गावात ही घटना घडली आहे. दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
advertisement
3/7
या जिलेटीनच्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे, जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
4/7
टाकळी कडेवळीत विहिरीचं खोदकाम सुरू असताना, स्फोट घडवण्यासाठी जिलेटिनच्या कांड्या लावण्यात आल्या होत्या. मात्र हे कामगार विहिरीतून बाहेर येण्याच्या तयारीत असतानाच जिलेटीनचा स्फोट झाला.
advertisement
5/7
हा स्फोट इतका भीषण होता की या घटनेत विहिरीत काम करणारे चारही कामगार विहिरीबाहेर फेकले गेले. मोठा स्फोट झाला.
advertisement
6/7
या दुर्घटनेत सुरज इनामदार, नागनाथ गावडे, जब्बार इनामदार, या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
advertisement
7/7
दरम्यान या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
पाण्याच्या शोधात पडला रक्ताचा सडा, मृतदेहांचे उडाले तुकडे, अहमदनगरमधली घटना