Female Loco Pilot: लोकोची महाराणी सुरेखा यादव सेवानिवृत्त, आशियातील पहिल्या महिला लोको पायलटचा होता मान
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Female Loco Pilot: कित्येक डब्यांची अवजड रेल्वे चालवणे हे मोठं आव्हानाचं काम आहे. मात्र, मूळच्या साताऱ्याच्या असलेल्या सुरेखा यादव यांनी ही जबाबदारी अगदी लिलया सांभाळली. आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक (लोको पायलट) असलेल्या सुरेखा यादव 18 सप्टेंबर रोजी 36 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या.
advertisement
1/7

सुरेखा यादव यांचा जन्म साताऱ्यात झाला. 1980 मध्ये त्यांनी भारतीय रेल्वे मध्ये प्रवेश केला आणि पहिल्या महिला पॅसेंजर ट्रेन चालक होण्याचा मान प्राप्त केला. सुरेखा यादव यांनी त्यावेळी दाखवलेल्या धाडसामुळे त्या अनेक महिला आणि तरुणींसाठी प्रेरणा ठरल्या.
advertisement
2/7
महिलांच्या पारंपरिक क्षेत्रात काम करण्यापेक्षा धाडसी आणि महत्त्वपूर्ण क्षेत्रात त्यांनी आपली ओळख निर्माण केली. रेल्वे चालक म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात खूप आव्हानात्मक होती. कारण, त्या काळात महिलांनी रेल्वे चालक होणं, धाडसी निर्णय मानला जात होता.
advertisement
3/7
सुरेखा यादव यांची दृढनिश्चय, कष्ट आणि कामाची आवड म्हणून या क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्या पंढरपूर-मुंबई, पुणे-मुंबई आणि इतर महत्त्वाच्या मार्गांवर रेल्वे चालवत होत्या. सुरेखा यादव यांची कार्यशैली आणि त्यांची धाडसी वाटचाल आजही अनेक महिलांसाठी आदर्श ठरते.
advertisement
4/7
सुरेखा यादव यांनी स्त्री असल्याचा आपल्या कामात कधीही अडथळा येऊ दिला नाही. बदलत्या काळासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वे संचालनासाठी प्रचंड कौशल्य विकसित केलं. त्यांचं हे काम भारतीय रेल्वेमध्ये महिलांच्या समावेशाची नांदी ठरली.
advertisement
5/7
18 सप्टेंबर रोजी त्यांनी 'राजधानी ट्रेन' चालवून आपल्या करिअरचा समारोप केला. अखेरच्या प्रवासात देखील त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. निवृत्तीनंतरही त्यांच्या कामाचा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा ठसा कायम राहील.
advertisement
6/7
सुरेखा यादव यांच्या ऐतिहासिक कार्याने, भारतीय रेल्वेच्या इतिहासातच तर नाहीतर देशातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या कामात देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
advertisement
7/7
कित्येक डब्यांची अवजड रेल्वे चालवणे हे मोठं आव्हानाचं काम आहे. मात्र, मूळच्या साताऱ्याच्या असलेल्या सुरेखा यादव यांनी ही जबाबदारी अगदी लिलया सांभाळली. आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक (लोको पायलट) असलेल्या सुरेखा यादव 18 सप्टेंबर रोजी 36 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Female Loco Pilot: लोकोची महाराणी सुरेखा यादव सेवानिवृत्त, आशियातील पहिल्या महिला लोको पायलटचा होता मान