TRENDING:

350 प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बुडाली! हवामान स्वच्छ, उंच लाटाही नव्हत्या; मग काय झालं?

Last Updated:
Philippines Ferry Sinks : सोमवारी पहाटे एका दुर्घटनेने सगळ्यांना हादरवून सोडलं आहे. 350 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी एक फेरी बुडाली.
advertisement
1/7
350 प्रवाशांना नेणारी फेरी बुडाली! हवामान स्वच्छ, उंच लाटाही नाही; मग झालं काय?
सोमवारी पहाटे एका दुर्घटनेने सगळ्यांना हादरवून सोडलं आहे. 350 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी एक फेरी बुडाली.  या फेरीत 332 प्रवासी आणि 27 क्रू मेंबर्स होते. मीडिया रिपोर्टनुसार 15 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 28 प्रवासी बेपत्ता आहेत. तर इतरांना वाचवण्यात यश मिळालं आहे.
advertisement
2/7
बरेच प्रवासी जवळच्या गावात पोहत गेले, जिथं स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी त्यांना वाचवलं. बचाव कार्यात तटरक्षक दल आणि नौदलाची जहाजे, एक देखरेख विमान, हवाई दलाचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि डझनभर मासेमारी नौका सहभागी आहेत. समुद्रात शोधकार्य सुरू आहे. अनेक लोकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
advertisement
3/7
फिलीपिन्समधील ही धक्कादायक घटना आहे. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमव्ही त्रिशा किर्स्टिन 3 नावाची ही फेरी झांबोआंगा शहरातून सुलू प्रांतातील जोलो बेटाकडे जात होती. बॅसिलान प्रांताजवळ ही दुर्घटना झाली.
advertisement
4/7
आश्चर्याची गोष्ट म्हणजे अपघाताच्या वेळी हवामान स्वच्छ होतं. वादळ किंवा उंच लाटा नव्हत्या. फेरी बेटापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर गेली आणि बुडाली. जहाजात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगितलं जातं आहे.
advertisement
5/7
बसिलान प्रांताचे गव्हर्नर मुजीव हतामन म्हणाले की, किनाऱ्यावर आणलेल्या जखमींवर उपचार करण्यासाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. काही मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. सरकारने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ते फेरीमध्ये तांत्रिक बिघाड कसा झाला आणि सुरक्षा मानकांमध्ये काही त्रुटी होत्या का हे पाहतील.
advertisement
6/7
फिलीपिन्समध्ये यापूर्वीही अपघात झाले आहेत. हजारो बेटे असलेल्या फिलीपिन्समध्ये लोक दररोज बोटी आणि फेरीने प्रवास करतात. जुनी जहाजे, खराब देखभाल, जास्त गर्दी आणि हलगर्जीपणा सुरक्षा नियमांमुळे अनेकदा मोठ्या दुर्घटना घडतात.
advertisement
7/7
देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी सागरी आपत्ती 1987 मध्ये घडली, जेव्हा डोना पाझ ही फेरी एका तेल टँकरशी धडकली. त्या दुर्घटनेत 4300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
350 प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बुडाली! हवामान स्वच्छ, उंच लाटाही नव्हत्या; मग काय झालं?
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल