Marathwada Weatehr: मराठवाड्यावर सूर्याचा कोप! नांदेडचा पारा 44 पार, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Weather: मराठवाड्यात उष्णतेची तीव्रता प्रचंड वाढली आहे. नांदेडमध्ये तापमान 44 अंशांवर गेलंय. आजचं हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5

भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार 23 एप्रिल रोजी महाराष्ट्र व मराठवाडा विभागात उष्णतेचा जोर अधिक वाढणार आहे. बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तापमान 41 अंश ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असून पुढील दोन-तीन दिवस उन्हाचा तडाखा आणखी वाढणार आहे.
advertisement
2/5
बीड जिल्ह्यात 23 एप्रिल रोजी कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश राहण्याची शक्यता आहे. 24 एप्रिललाही हेच तापमान कायम राहण्याची शक्यता आहे. बीडमध्ये आकाश पूर्णपणे स्वच्छ राहणार असून प्रखर ऊन जाणवेल.
advertisement
3/5
लातूर जिल्ह्यातही 23 एप्रिल रोजी उष्णतेचा जोर राहणार आहे. येथे कमाल तापमान 42 अंश व किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहील. 24 एप्रिल रोजी तापमानात फारसा बदल होणार नाही. लातूरमध्येही प्रखर ऊन राहील.
advertisement
4/5
धाराशिव जिल्ह्यात 23 एप्रिलला कमाल तापमान 43 अंश व किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. 24 एप्रिललाही असेच तापमान राहण्याची शक्यता आहे. आकाश निरभ्र राहणार असून उन्हाची तीव्रता अधिक जाणवणार आहे.
advertisement
5/5
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. येथे 23 एप्रिलला कमाल तापमान 44 अंश व किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहील. 24 व 25 एप्रिललाही तापमान कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बीड/
Marathwada Weatehr: मराठवाड्यावर सूर्याचा कोप! नांदेडचा पारा 44 पार, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?