Beed Weather: सावधान! आज आस्मानी संकट, बीड, लातूरसह 4 जिल्ह्यांना अलर्ट, 24 तास धोक्याचे
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Weather: एप्रिलअखेर मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे. आज बीड, लातूरसह 4 जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
1/7

राज्यात उष्णतेची लाट असतानाच एप्रिलअखेर मराठवाड्यावर नवं संकट घोंघावत आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड आणि बीड जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
2/7
आज मराठवाड्यातील कमाल तापमान 36 ते 38 अंशांदरम्यान राहील तर किमान तापमान 22 ते 24 अंशांदरम्यान असेल. नागरिकांनी हवामान खात्याचे अपडेट पाहूनच शेतकामे व प्रवासाचे नियोजन करावे.
advertisement
3/7
लातूर जिल्ह्यात आज दुपारनंतर आकाश ढगाळ राहणार आहे. विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी गहू, हरभरा आणि फळबागांचे संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
धाराशिव जिल्ह्यात आज आणि उद्या आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दुपारी व संध्याकाळी विजांचा कडकडाट आणि वादळे वारे वाहणार असून काही भागांत गारपिटीची शक्यता आहे. आज कमाल तापमान 36 अंशांपर्यंत खाली येऊ शकते. शेतकरी व नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
5/7
नांदेड जिल्ह्यात आज काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. गारपीट होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी तयार पिकांचे योग्य संरक्षण करावे. कमाल तापमान 37 अंशांच्या आसपास राहील. वाऱ्याचा जोर वाढण्यामुळे उघड्यावर काम करणे टाळावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
advertisement
6/7
बीड जिल्ह्यात आज दुपारनंतर ढगाळ हवामान राहील. विजांच्या कडकडाटासह थोडकाच पण जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये गारपिटीची शक्यता असल्याने फळबागा आणि पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेगही 30 ते 40 किमी प्रतितास होऊ शकतो.
advertisement
7/7
दरम्यान, हवामानातील बदलांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील शेतीपिकांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच गारपिटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना फळबागांचे देखील योग्य ते व्यवस्थापन करावे लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बीड/
Beed Weather: सावधान! आज आस्मानी संकट, बीड, लातूरसह 4 जिल्ह्यांना अलर्ट, 24 तास धोक्याचे