TRENDING:

Beed Weather: सावधान! हवामानात मोठे बदल, बीड, नांदेडकरांना धोका, नेमका अलर्ट काय?

Last Updated:
Marathwada Weather: एप्रिलअखेर मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज बीड, लातूर, नांदेडमधील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5
Beed Weather: सावधान! हवामानात मोठे बदल, बीड, नांदेडकरांना धोका, नेमका अलर्ट काय
मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सर्वत्र उष्णतेची लाट जाणवणार आहे. आज आकाश निरभ्र राहील आणि पावसाची शक्यता कमी आहे.
advertisement
2/5
बीड जिल्ह्यात आज कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये बीडमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि उन्हापासून बचाव करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
3/5
लातूर जिल्ह्यातही आज तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. हवामान विभागानुसार लातूरमध्ये पुढील काही दिवस तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. सध्या आकाश निरभ्र असून पावसाची शक्यता नसल्यामुळे उष्णतेचा अधिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सकाळी व संध्याकाळीच घराबाहेर पडावे असा सल्ला दिला जात आहे.
advertisement
4/5
धाराशिव जिल्ह्यात आजचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस असणार आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार आहे. शेतकरी व कामगारांनी गरजेनुसार दुपारी घराबाहेर पडावे. तसेच वयोवृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
5/5
नांदेड जिल्ह्यातही आज तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील काही दिवसांमध्ये नांदेडमध्ये तापमान वाढून 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी थंड पेय तसेच फळांचे सेवन आणि पाणी अधिक प्यावे. त्याचबरोबर उन्हात थेट प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आलेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बीड/
Beed Weather: सावधान! हवामानात मोठे बदल, बीड, नांदेडकरांना धोका, नेमका अलर्ट काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल