TRENDING:

आजचं हवामान: सूर्याचा पारा चढला, मराठवाड्यात उष्णतेची लाट, बीडसह 4 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Marathwada Weather: मराठवाड्यात उष्णतेचा पारा चांगलाच चढला आहे. बीड, लातुर, धाराशिव आणि नांदेडच्या हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5
आजचं हवामान: सूर्याचा पारा चढला, मराठवाड्यात उष्णतेची लाट, 4 जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात उष्णतेचा पारा चढला असून मराठवाड्यात देखील तापमानात मोठी वाढ झालीये. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड या शहरांमध्ये जोरदार उष्णतेची लाट राहणार आहे. या चारही शहरांमध्ये तापमान चांगलेच वाढणार असून लोकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
2/5
बीडमध्ये कमाल तापमान सुमारे 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. लातूरमध्येही उन्हाची तीव्रता जाणवणार असून तापमान 40 अंशाच्या आसपास राहील.
advertisement
3/5
धाराशिव येथे 41 अंश तापमान असेल तर नांदेडमध्ये सर्वाधिक म्हणजे 42 अंश सेल्सिअस तापमान होईल असा अंदाज आहे.  पुढील काही दिवस मराठवाड्यात उष्णतेची स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
advertisement
4/5
उष्णतेमुळे दुपारच्या वेळात बाहेर पडल्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे, हलक्या रंगाचे आणि सैलसर कपडे घालावेत, असेही हवामान खात्याने सांगितले आहे.
advertisement
5/5
उन्हात काम करणाऱ्यांनी डोक्यावर टोपी घालावी, अंगावर पाणी शिंपडावे आणि वेळोवेळी सावलीत विश्रांती घ्यावी. तसेच थंड पेये, लिंबूपाणी किंवा फळांचा रस घ्यावा जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही. लहान मुले, वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बीड/
आजचं हवामान: सूर्याचा पारा चढला, मराठवाड्यात उष्णतेची लाट, बीडसह 4 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल