TRENDING:

Photo : बुलढाण्यात 'ट्रॅक्टरपोळा', 200 ट्रॅक्टरसह शेतकऱ्यांनी साजरा केला आधुनिक सण

Last Updated:
राहुल खंडारे, बुलढाणा : शेतकऱ्यांसोबत रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वत्र पोळा हा सण साजरा केला जातो, परंतु आजच्या आधुनिक युगामध्ये शेतकऱ्याकडील बैल जोड्यांची संख्या कमी झाली आहे.
advertisement
1/7
बुलढाण्यात 'ट्रॅक्टरपोळा', 200 ट्रॅक्टरसह शेतकऱ्यांनी साजरा केला आधुनिक सण
सोमवारी राज्यात सर्वत्र बळीराजाचा बैलपोळा साजरा होत आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणत शेती उपयोगी कामे केली जातात.
advertisement
2/7
आजच्या शेतीमध्ये बैलांची आणि ट्रॅक्टर यांची उपयोगिता सारखीच असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे पोळ्यानिमित्त ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं, यामध्ये तब्बल 200 टॅक्टर सहभागी झाले होते. त्यांच्या रॅलीचे हे दृश्य समोर आले आहेत.
advertisement
3/7
शेतकऱ्यांसोबत रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वत्र पोळा हा सण साजरा केला जातो, परंतु आजच्या आधुनिक युगामध्ये शेतकऱ्याकडील बैल जोड्यांची संख्या कमी झाली आहे.
advertisement
4/7
शेतीच्या कामगिरी आता ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो किंबहुना त्या माध्यमातून शेतीची कामे केले जातात, त्यामुळे पोळ्या सारखे सण उत्सव हे पुढेही कायम राहावे या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शेतकरी बांधवांच्या वतीने एक आगळा वेगळा पोळा साजरा करत आहेत.
advertisement
5/7
ही मिरवणूक मेहकर शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली. या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये जवळपास 200 ट्रॅक्टर सहभागी झाले होते. जे वर्षभर आपल्या बळीराजा करिता शेतात सर्जा राजाच्या बरोबरीने आजच्या आधुनिक युगात योगदान देत असतात.
advertisement
6/7
या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव स्वतः आपले ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर पोळ्याच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
advertisement
7/7
बुलढाण्यात ट्रॅक्टर पोळा हा पहिल्यांदाच साजरा केला जात आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ आपल्याकडे सर्वांचं लक्ष केंद्रीत करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Photo : बुलढाण्यात 'ट्रॅक्टरपोळा', 200 ट्रॅक्टरसह शेतकऱ्यांनी साजरा केला आधुनिक सण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल