Bhendval prediction : भेंडवळचं भाकीत जाहीर; पावसाबाबत मोठी भविष्यवाणी, जाणून घ्या कोणत्या महिन्यात किती पाऊस पडणार?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घट मांडणी राज्यभरात प्रसिद्ध आहे. विदर्भातील असंख्य शेतकरी याच घट मांडणीच्या आधारे खरीप व रब्बी हंगामाचे नियोजन करत असतात. हे भाकीत ऐकण्यासाठी दूरवरून शेतकरी या ठिकाणी येतात.
advertisement
1/7

2/7
या घटमांडणीच्या वेळी गावाच्या पूर्वेस एका शेतात अठरा प्रकारची धान्ये एका गोलाकार आकारात ठराविक अंतरावर ठेऊन या गोलाच्या मध्यभागी एक खड्डा तयार केला जातो. त्यात चार मातीचे गोळे ठेऊन एक पाण्याची घागर ठेवली जाते. त्यावर पुरी, करंजी, पान सुपारी ठेवण्यात येते.
advertisement
3/7
येथे मांडण्यात आलेली प्रत्येक वस्तू हे एक प्रतिक असते. अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे घटात झालेल्या बदलाच्या आधारे पाऊस, पीके आणि राजकीय भाकीत वर्तवलं जातं.
advertisement
4/7
आज सकाळी सूर्योदयाच्या वेळेस या घट मांडणीत झालेल्या बदलाच्या आधारे भाकीत वर्तवण्यात आलं आहे. यावर्षी पाऊस चांगला राहणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे.
advertisement
5/7
भेंडवळच्या घट मांडणीनुसार यावर्षी जून महिन्यात कमी पाऊस पडणार आहे, तर जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण हे सर्वसाधारण असणार आहे. ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे. संप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडेल असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे.
advertisement
6/7
दरम्यान देशावर कोणतंही आर्थिक तसेच परकीय संकट येणार नसल्याचंही भाकीत वर्तवण्यात आलं आहे.
advertisement
7/7
तसेच यावर्षी पृथ्वीवर देखील कोणतही संकट नसल्याचं भाकीत या भेंडवळच्या घटमांडणीच्या वेळी वर्तवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बुलढाणा/
Bhendval prediction : भेंडवळचं भाकीत जाहीर; पावसाबाबत मोठी भविष्यवाणी, जाणून घ्या कोणत्या महिन्यात किती पाऊस पडणार?