Buldhana accident : ड्रायव्हरची डुलकी प्रवाशांच्या जीवावर बेतली; शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
बुलढाण्यामधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, स्कॉर्पिओचा अपघात झाला आहे. राहुल खंडारे, प्रतिनिधी
advertisement
1/5

बुलढाण्यामधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला आहे.
advertisement
2/5
या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका आठ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे
advertisement
3/5
दरम्यान जखमी प्रवाशांना उपचारासाठी स्थानिकांच्या मदतीनं खामगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
advertisement
4/5
खामगाव तालुक्याच्या आंबेटाकळी - बोरी आडगाव रोडवर हा भीषण अपघात घडला आहे. अपघात नेमका कसा घडला याबाबत अजून माहिती स्पष्ट नाही. मात्र चालकाला डुलकी लागल्यानं हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
advertisement
5/5
हे सर्व प्रवासी गडचिरोली जिल्ह्यातील असून, शिर्डी येथे दर्शन करून परत जात असताना हा अपघात घडला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana accident : ड्रायव्हरची डुलकी प्रवाशांच्या जीवावर बेतली; शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात