TRENDING:

Buldhana accident : बुलढाण्यात मोठी दुर्घटना; 48 प्रवाशी असलेली ट्रॅव्हल्स बस जळून खाक, घटनास्थळाचे पहिले photos

Last Updated:
बुलढाणा जिल्ह्यात खासगी लक्झरी बसनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
advertisement
1/7
बुलढाण्यात मोठी दुर्घटना; 48 प्रवाशी असलेली ट्रॅव्हल्स बस जळून खाक
बुलढाणा जिल्ह्यात खासगी लक्झरी बसनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
advertisement
2/7
चिखली जवळील मेहकर फाटा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. बसला अचानक आग लागल्यानं घटनास्थळी एकचा गोंधळ उडाला.
advertisement
3/7
ही खासगी बस लग्नाचं वऱ्हाड घेऊन चंद्रपूरवरून बुलढाण्याला निघाली होती. मात्र वाटेतच बसला भीषण आग लागली.
advertisement
4/7
बसला नेमकी आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, मात्र शॉट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
advertisement
5/7
या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये, मात्र प्रवाशांचं संपूर्ण साहित्य जळून खाक झालं आहे.
advertisement
6/7
या बसमधील प्रवासी हे चहा पिण्यासाठी खाली उतरले होते, त्याचवेळी या बसनं अचानक पेट घेतला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
advertisement
7/7
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्नशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली, मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता, या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana accident : बुलढाण्यात मोठी दुर्घटना; 48 प्रवाशी असलेली ट्रॅव्हल्स बस जळून खाक, घटनास्थळाचे पहिले photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल