समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्सवर अज्ञातांकडू दगडफेक, 3 जण जखमी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दोन खासगी ट्रॅव्हल्सवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली.
advertisement
1/5

बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दोन खासगी ट्रॅव्हल्सवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली.
advertisement
2/5
समृद्धी महामार्गावर बिबी गावाजवळ हा प्रकार घडला आहे, बसवर अचानक दगडफेक सुरू झाल्यानं प्रवाशांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं
advertisement
3/5
या दगडफेकीमध्ये एका बसमधील दोन प्रवाशांसह चालक जखमी झाला आहे. दगडफेकीनंतर दगडफेक करणारे फरार झाले.
advertisement
4/5
या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींवर समृद्धी रुग्णवाहिकेतील डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. या दोन्ही बस नागपूरवरून मुंबईच्या दिशेनं निघाल्या होत्या.
advertisement
5/5
दरम्यान दगडफेकीनंतर चालकानं दोन किमी अंतरावर बस थांबवून प्रसंगावधान राखत पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. घटनेबाबत तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बुलढाणा/
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्सवर अज्ञातांकडू दगडफेक, 3 जण जखमी