Weather Alert: काळजी घ्या! दिवाळीआधी मराठवाड्यावर नवं संकट, IMD कडून महत्त्वाचं अपडेट
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Rain: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असून आता पावसाने उघडी दिलीये. मराठवाड्याला मात्र दिवाळीआधी नव्या संकटाला सामोरं जावं लागत आहे.
advertisement
1/5

मराठवाड्यात ऑक्टोबर हिटचा प्रभाव अधिक तीव्र होत असून तापमानात सतत वाढ होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 12 ऑक्टोबर (आज) मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी कोणताही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. संपूर्ण राज्यभर हवामान कोरडे राहणार असून काही भागात दिवसभर ऊन आणि उष्ण वातावरण जाणवणार आहे.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तापमानात मागील 24 तासांत सरासरी 1 ते 2 अंशांची वाढ झाली आहे. आज संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहील. बीड आणि लातूर जिल्ह्यांत तापमान 34 अंशांपर्यंत पोहोचेल, तर धाराशिव आणि जालना जिल्ह्यांमध्ये 33 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
नांदेडमध्ये आज सर्वाधिक 36 अंश सेल्सिअसपर्यंत पारा जाण्याची शक्यता आहे, तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये तापमान अनुक्रमे 34 आणि 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. रात्रीच्या वेळी सौम्य थंडीची चाहूल लागेल, आणि तापमान 19 ते 21 अंशांदरम्यान खाली येईल, असा अंदाज आहे.
advertisement
4/5
हवामान विभागाच्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात तापमानात होणारी ही वाढ म्हणजेच ‘ऑक्टोबर हिट’ असून ती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. दुपारच्या सुमारास उकाडा वाढण्यासोबतच उन्हाचा चटका अधिक जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना सावलीत थांबणे, पाणी पिणे आणि डोक्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
advertisement
5/5
दरम्यान, पावसाची विश्रांती आणि तापमान वाढ या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामाच्या तयारीसाठी हे हवामान शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरत आहे. गहू, हरभरा आणि ज्वारीसारख्या पिकांच्या पेरणीपूर्व तयारीसाठी कोरडे आणि ऊन असलेले हवामान लाभदायक असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: काळजी घ्या! दिवाळीआधी मराठवाड्यावर नवं संकट, IMD कडून महत्त्वाचं अपडेट