Marathwada Rain: सोसाट्याचा वारा अन् विजांचा कडकडाट, मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील काही भागात पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे. 12 ऑगस्ट रोजी देखील या भागात पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहील. सकाळपासूनच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे, तर दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळतील. बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, आज कोणताही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला नाही.
advertisement
4/5
मराठवाड्यात आर्द्रतेचे प्रमाण जवळपास 95 टक्क्यांपर्यंत राहणार असून, वातावरणात गारवा वाढेल. पश्चिमेकडून सुमारे 15 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. जोरदार वाऱ्यांसह पाऊस सुरू राहिल्यास विजेच्या तारा, झाडे पडणे, तसेच वाहतूक कोंडीसारख्या अडचणी उद्भवू शकतात. अशा स्थितीत नागरिकांनी बाहेर जाताना योग्य साधनांचा वापर करावा.
advertisement
5/5
हवामान तज्ज्ञांच्या मते मराठवाड्यातील पावसाचा हा जोर पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: सोसाट्याचा वारा अन् विजांचा कडकडाट, मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट