TRENDING:

Weather Alert: मराठवाड्यात पुन्हा पावसाचं धुमशान, छ. संभाजीनगर, बीडसह 6 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. आज, शनिवारी छ. संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचं धुमशान, छ. संभाजीनगर, बीडसह 6 जिल्ह्यांना अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये वातावरणात बदल जाणवत आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि अधूनमधून वाहणाऱ्या गार वाऱ्याचा अनुभव येत आहे. काही भागांत हलक्या सरींची नोंद झाली असून या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे.
advertisement
2/5
दिवाळीनंतर मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला होता. आज छत्रपती संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
3/5
25 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, जालना आणि धाराशिवमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांत आज ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून विजांसह पावसाचा अंदाज आहे.
advertisement
4/5
नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांच्या काही भागात शुक्रवारी विजांसह पावसाने हजेरी लावली. आज मात्र हवामानात विभागाने या दोन्ही जिल्ह्यांना कोणताही सतर्कतेचा इशारा दिलेला नाही. मात्र, ढगाळ आकाशासह हलका ते मध्यम पाऊस होईल.
advertisement
5/5
दरम्यान, मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पूर आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. पुढील 24 तास पावसाचा जोर राहणार असून त्यानंतर मराठवाड्यातील पावसाची तीव्रता कमी होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: मराठवाड्यात पुन्हा पावसाचं धुमशान, छ. संभाजीनगर, बीडसह 6 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल