TRENDING:

Weather Alert: कधी उन्ह तर कधी पाऊस, मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल, पाहा आजचं अपडेट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच हवामानाची विचित्र स्थिती जाणवत आहे. उन्हाचा पारा चढत असून सायंकाळी पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/5
Weather Alert: कधी उन्ह तर कधी पाऊस, मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल, आजचं अपडेट
मराठवाड्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. 31 ऑक्टोंबर रोजी दमट हवामान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळालं. एक नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ होणार असून दमट हवामान कायम राहणार आहे. तर सायंकाळच्या वेळी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर मध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढं राहील. तसेच 1 ते 4 नोव्हेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
3/5
दक्षिण मराठवाड्यातील नांदेड आणि आसपासच्या परिसरामध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 3 नोव्हेंबर पर्यंत ढगाळ हवामानासह तापमानात वाढ जाणवणार असून तीन ते सहा नोव्हेंबरच्या दरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/5
धाराशिवमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. एक नोव्हेंबर रोजी कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 एवढं असेल. 1 आणि 3 नोव्हेंबर रोजी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर 2 नोव्हेंबर रोजी दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
5/5
दरम्यान, मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांमध्येही दमट हवामानामुळे कमाल तापमानात वाढ पाहायला मिळत आहे. तर सायंकाळच्या वेळी 1 ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: कधी उन्ह तर कधी पाऊस, मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल, पाहा आजचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल