Marathwada Rain: मराठवाड्यात हवापालट, पावसाचा जोर ओसरला, छ. संभाजीनगर ते बीड आजचं हवामान अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील काही काळ पावसाचा जोर कमी राहणार आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5

राज्यात गेल्या दिवसांत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. आता मात्र हवामानात बदल जाणवत असून मान्सूनचा जोर ओसरला असून मराठवाड्यात देखील पाऊस कमी असणार आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हलका ते मध्यम हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
आज 30 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरसह, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता असून काही ठिकाणी ढगांचा गडगडाट राहणार आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना कोणताही 'सतर्कतेचा अलर्ट' हवामान विभागाने जारी केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे फुलंब्री तालुक्यातील आळंद गावातील तलाव सहा वर्षांनंतर पूर्ण भरला आहे. तलाव भरल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. हा तलाव गावासाठी पाणीपुरवठा आणि शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा मुख्य स्रोत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव 100 टक्के भरला आहे असून ग्रामस्थांनी जलपूजन केले आहे.
advertisement
4/5
कन्नड तालुक्यातील वासडी, देवपुळ साखरवेल, पळशी, खातखेडा, रामनगर, निभोरा, तपोवन, मेहेगाव, हस्ता परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत होते. खरीप पिके धोक्यात आली होती. पण, गेल्या चार दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे निभोरा लघुप्रकल्प 100 टक्के भरला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यात आज हलका ते मध्यम पाऊस असण्याची शक्यता आहे. हवामानात बदल जाणवत असल्याने पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कामाचे योग्य ते नियोजन करावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: मराठवाड्यात हवापालट, पावसाचा जोर ओसरला, छ. संभाजीनगर ते बीड आजचं हवामान अपडेट