Marathwada Rain: मराठवाड्यात पाऊस कधी येणार? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने मान्सूनबाबत महत्त्वाचं अपडेट दिलं आहे.
advertisement
1/5

मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पाऊस अनियमित राहिला आहे. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील पाच दिवस पावसाचा जोर कमीच राहणार आहे.
advertisement
2/5
22 जून रोजी मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहील. परंतु, जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तुरळक पावसाच्या सरी पडू शकतात.
advertisement
3/5
पुढील काही दिवसांत मराठवाड्यातील तापमान 28 ते 30 अंश सेल्सियसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमान 25 अंशांच्या आसपास असेल. ढगाळ वातावरणामुळे दमटपणा जाणवणार असून उकाडा कमी होईल पण वातावरण आर्द्र राहील.
advertisement
4/5
कमी पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणीच्या कामात अडचणी येत आहेत. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी पावसाअभावी बियाणे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. हलक्या सरी पिकांना थोडा आधार देतील पण दीर्घकाळ टिकणारा पाऊसच खरीप पिकांसाठी आवश्यक आहे.
advertisement
5/5
दरम्यान, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पुढील काही दिवस पावसाचा कोणताही अलर्ट नाही. तरीही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, समाधानकारक पावसासाठी वाटच पाहावी लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: मराठवाड्यात पाऊस कधी येणार? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट