TRENDING:

Marathwada Rain: मराठवाड्यात पुन्हा ढग दाटले, आज 5 जिल्ह्यांत धो धो पाऊस, 48 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पुन्हा पाऊस बरसणार असून 48 तासांसाठी 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5
मराठवाड्यात पुन्हा ढग दाटले, आज 5 जिल्ह्यांत धो धो पाऊस, 48 तासांसाठी अलर्ट
राज्यातील कोकण, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील घाट भागात पावसाचा जोर आहे. परंतु, मराठवाड्यात मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंता वाढल्या असून आभाळाकडे डोळे लागले आहेत. आज, 19 जून रोजीचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जरी केला आहे.या पाचही जिल्ह्यात 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहून विजांच्या कळकटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
advertisement
3/5
बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र आज कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. तरीही एक-दोन ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात सामान्यतः ढगाळ आकाश राहील. तर तापमान 35 अंशांच्या दरम्यान राहील. 2 दिवसाच्या पावासनंतर पुन्हा पाऊस उघडीप देण्याची शक्यता हवामान विभागाने वर्वतली आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह पाच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यंदा विजा कोसळून मराठवाड्यात काहींना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी विजांपासून स्वतःची काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: मराठवाड्यात पुन्हा ढग दाटले, आज 5 जिल्ह्यांत धो धो पाऊस, 48 तासांसाठी अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल