Rain Alert: ताशी 50 किमीने वारे वाहणार, मराठवाड्याला पुन्हा झोडपणार, 6 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात गेल्या काही काळात पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5

राज्यात अवकाळी पावसाचे धुमशान सुरूच असून मान्सून देखील दाखल झाला आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर कायम असून सर्वच जिल्ह्यांत जोरदार पाऊस होतोय. आज पुन्हा वादळी पावसाचा इशारा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना देण्यात आला आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात 40 ते 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहतील. गेल्या काही दिवसांत संभाजीनगरसह लातूर, धाराशिव, नांदेडमध्ये जोरदार पाऊस झाला. याठिकाणी आज पुन्हा पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगर शहराला देखील 24 तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. बुधवारी संभाजीनगर शहरात 21 मि.मी. पाऊस झाला. आज देखील शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
5/5
दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये. तसेच आपले काढलेले पिक सुरक्षित ठिकाणी ठेवावे. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Rain Alert: ताशी 50 किमीने वारे वाहणार, मराठवाड्याला पुन्हा झोडपणार, 6 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा