TRENDING:

Marathwada Weather : मराठवाड्यातील तापमानामध्ये मोठे बदल, गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला अलर्ट

Last Updated:
मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचे सावट अजूनही कायम आहे. आज मराठवाड्यात वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
मराठवाड्यातील तापमानामध्ये मोठे बदल, गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील तापमानामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचे सावट अजूनही कायम आहे. आज मराठवाड्यात वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
advertisement
3/5
मराठवाड्यामध्ये लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर लातूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये देखील काल पावसाने हजेरी लावली होती. संभाजीनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे. आणि या पावसामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान देखील झालेले आहे. शहरांमध्ये आज देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शहरामध्ये आज तापमान हे 36 अंश सेल्सिअस असेल.
advertisement
4/5
त्यासोबतच हिंगोली, बीड, जालना या ठिकाणी तापमान हे 38 अंश सेल्सिअस असेल. या ठिकाणच्या नागरिकांनी देखील सतर्क राहावे. या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
advertisement
5/5
धाराशिव, परभणी आणि नांदेड या ठिकाणी तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअस असेल. तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, आपली स्वतःची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी तसेच शेतातील मान्सूनपूर्व कामे देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather : मराठवाड्यातील तापमानामध्ये मोठे बदल, गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल