TRENDING:

Weather Alert: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल, पाऊस उघडला, आता नव्या संकटाची चाहुल!

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात गेल्या काही काळात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पावसाने उघडीप दिली असून पुन्हा नवीन संकटाची चाहुल लागली आहे.
advertisement
1/5
मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल, पाऊस उघडला, आता नव्या संकटाची चाहुल!
गेल्या महिन्यात मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पण मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला असून पावसाने उघडीप दिली आहे. मराठवाड्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
2/5
मागील काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगर शहरात तापमानात मोठी वाढ बघायला मिळतेय. पावसाने विश्रांती घेतली असून तापमान 33 अंशांवर गेलंय. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढला आहे. तर आज संभाजीनगरमध्ये आकाश ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/5
हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील 3 जून रोजी वातावरण ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या तीनही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानात मोठी वाढ जाणवत असून पारा 33 अंशांवर गेला आहे.
advertisement
4/5
धाराशिव, बीड आणि जालना या ठिकाणी देखील पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. आज या ठिकाणी वातावरण अंशतः ढगाळ राहील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/5
दरम्यान, मराठवाड्यात गेल्या काही काळा जोरदार वादळी पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता पुन्हा हवापालट झाली असून पावसाने दडी मारलीये. त्यामुळे तापमानात वाढ होत असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल, पाऊस उघडला, आता नव्या संकटाची चाहुल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल