मराठवाड्यात थंडीचा जोर वाढला, आज काय असणार तुमच्या जिल्ह्यात हवामानाची स्थिती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
मराठवाड्यात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. तापमानाचा पारा 14 अंशांपर्यंत खाली आला असून आजचे हवामान जाणून घ्या.
advertisement
1/5

राज्यातील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात काही ठिकाणी रात्री आणि सकाळी कडाक्याची थंडी जाणवत आहे. पुढील काही दिवसांत राज्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर शहराचे कमाल तापमान आज 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढं असेल. शहरातली तापमानात मोठी घट झालेली आहे. रात्री आणि सकाळी थंडीने जोर धरायला सुरुवात केलेली आहे.
advertisement
3/5
जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील आता थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. परभणी, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट झालेली आहे.
advertisement
4/5
मराठवाडामध्ये थंडीने मुळे ठिकठिकाणी आता नागरीक शेकोटी पेटवतात आहेत. तसेच थंडीसाठी लागणाऱ्या गरम कड्यांची खरेदी करण्यासाठी देखील गर्दी होत आहे.
advertisement
5/5
शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची योग्य ती काळजी घ्यावी. तुरीच्या पिकाची काळजी घ्यावी. तुरीच्या पिकावर आळीचां प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती फवारणी करावी. तसेच आपल्या इतरही पिकांची काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यात थंडीचा जोर वाढला, आज काय असणार तुमच्या जिल्ह्यात हवामानाची स्थिती?