TRENDING:

Marathwada Weather : वादळी वारे वाहणार, पाऊस झोडपणार, मराठवाड्यासाठी हवामान विभागाचा यलो अलर्ट

Last Updated:
मराठवाड्यात देखील पावसाचा जोर कायम आहे. पुढील 24 तासांसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/5
वादळी वारे वाहणार, पाऊस झोडपणार, मराठवाड्यासाठी हवामान विभागाचा यलो अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावलीये. मराठवाड्यात देखील पावसाचा जोर कायम आहे. पुढील 24 तासांसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहतील.
advertisement
3/5
हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी देखील आज पावसाची शक्यता हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तरी इथल्या नागरिकांना सतर्क राहावे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये काल दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरामध्ये काल 59.4 मिमी एवढा पाऊसची नोंद झालेली आहे. शहरामध्ये आज देखील ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची देखील शक्यता हवामान खात्याकडून सांगितले आहे. शहरामध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रमाणे वादळी वारे वाहतील. तसंच नागरिकांनी सतर्क राहावे.
advertisement
5/5
पुढील काही दिवस मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे जोर कायम राहणार आहे. तरी सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. पाऊस पडल्यामुळे नागरिकांना गर्मीपासून थोडीसा दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकऱ्यांनी पण आपल्या शेतातील काळजी घ्यावी, असं सांगण्यात आलेला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather : वादळी वारे वाहणार, पाऊस झोडपणार, मराठवाड्यासाठी हवामान विभागाचा यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल