Weather Alert: मराठवाड्यात अचानक हवापालट, 2 दिवस होरपळणार, आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Marathwada Weather: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 2 दिवस उष्णतेचा पारा चांगलाच सतावणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5

एप्रिलअखेर हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मराठवाड्यात पुन्हा तापमानाचा पारा चढणार असून हवामान विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
2/5
मराठवाड्यात किमान 25 अंश ते कमाल 43 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदवलं गेलंय. पुढील 2 दिवस मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांत हवामान कोरडे राहणार असून काही ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/5
परभणी येथे उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून पारा 44 अंशांवर गेला आहे. आज परभणीला उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला असून कमाल तापमान 43 पार जाण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगर किमान तापमान 23 अंश तर कमाल 41 अंश सेल्सिअस एवढे असेल. तसेच पुढील 2 दिवसांसाठी बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट राहील.
advertisement
5/5
दरम्यान, वाढत्या तापमानाबरोबरच मराठवाड्यात भीषण पाणीटंचाईचं संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जायकवाडी धरणातील पाणीपातळीत मोठी घट झालीये. तसेच सर्व लघु आणि मध्यम प्रकल्पांत देखील पाणीपातळी घटली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना योग्य ते नियोजन करावे लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: मराठवाड्यात अचानक हवापालट, 2 दिवस होरपळणार, आजचा हवामान अंदाज