Marathwada Weather : मराठवाड्यात उष्णतेचा कडाका कायम, छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा चढला, पाहा आजचं हवामान
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत राज्यात उष्णतेचा कडाका कायम असणार आहे. मराठवाड्यात 1 मे रोजी हवामानाची स्थिती कशी राहील जाणून घेऊया.
advertisement
1/5

राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत राज्यात उष्णतेचा कडाका कायम असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. मराठवाड्यात 1 मे रोजी हवामानाची स्थिती कशी राहील जाणून घेऊया.
advertisement
2/5
1 मे रोजी छत्रपती संभाजीनगर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस एवढे असेल तर कमाल तपामान 43 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बीड जिल्ह्यात सध्या हवामान ढगाळ असून उष्णतेची तीव्रता देखील कायम आहे. आज आणि पुढील काही दिवस तापमान 40 अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने पिकांना पाण्याची योग्य व्यवस्था करणे आवश्यक ठरणार आहे.
advertisement
3/5
लातूर जिल्ह्यातील अनेक भागांत उष्म्याची लाट जाणवत असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. लातूरमध्ये आज 41 अंश सेल्सियस तापमान असेल. उष्णतेपासून संरक्षणासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळेस घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे.
advertisement
4/5
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेत वाढ झाल्याचे जाणवत असून त्यामुळे ढगाळ वातावरण तयार होत आहे. नांदेडमध्ये आज 42 अंश सेल्सियस तापमान असेल. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील पिकांसाठी जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
advertisement
5/5
धाराशिव जिल्ह्यातही सध्या प्रखर उष्णतेचा अनुभव येत आहे. धाराशिवमध्ये आज 41 अंश सेल्सियस तापमान असेल. तापमान सरासरीपेक्षा अधिक असून दुपारच्या वेळेस उष्माघाताचा धोका वाढतो आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही भागांत पुढील काही दिवसांत वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण तयार होऊ शकते परंतु मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता फारशी नाही. नागरिकांनी गरजेची काळजी घेऊन आरोग्याची विशेष दक्षता घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather : मराठवाड्यात उष्णतेचा कडाका कायम, छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा चढला, पाहा आजचं हवामान