मराठवाड्यावर पुन्हा संकट, या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, पाहा आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Weather Forecast: मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आज काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घ्या हवामानाचं अपडेट.
advertisement
1/5

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिक कोकणानंतर आता मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.
advertisement
2/5
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचे चटके जाणवत होते. मात्र, दिवाळीनंतर मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. त्यामुळे तिन्ही ऋतू एकत्रच असल्याचे चित्र निर्माण झालेय.
advertisement
3/5
मराठवाड्यातील धाराशिव, लातुर या जिल्ह्यांत आज पावसाचा अंदाज आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
4/5
मराठवाड्यातील कमाल आणि किमान तापमान घट नोंदवली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज निरभ्र आकाश राहील. सकाळी धुकं पडणार आहे. तसेच कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढं राहील.
advertisement
5/5
दरम्यान, बीड, हिंगोली आणि नांदेडमध्ये देखील आज तुरळक पावसाची शक्यता आहे. तर जालना आणि परभणीत पारा 17 अंशांवर आहे. हवामानातील बदलांमुळे शेती पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे फळबागा आणि इतर पिकांची योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यावर पुन्हा संकट, या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, पाहा आजचा हवामान अंदाज