मराठवाड्यात हुडहुडी! परभणीत पारा घसरला, पाहा ताजं हवामान अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसापासून सातत्याने बदल होत आहेत. मराठवाड्यातील तापमानामध्ये झपाट्याने मोठी घट होत आहे.
advertisement
1/5

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसापासून सातत्याने बदल होत आहेत. आता पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. मराठवाड्यातील तापमानामध्ये झपाट्याने मोठी घट होत आहे. पुढच्या आठवड्यामध्ये तापमानात अजून घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाड्यातील तापमान 12 अंश सेल्सिअस पर्यंत आहे.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कमाल तापमान 20 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
3/5
परभणीमध्ये आज किमान तापमान 12 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. जालना, बीड आणि धराशिव या जिल्ह्यांत किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे.
advertisement
4/5
हिंगोली, लातूर, नांदेड या जिल्ह्यात देखील किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढं असणार असून तापमानामध्ये अजून घट होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने सांगितली आहे.
advertisement
5/5
शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकांची आणि फळबागांची देखील काळजी घ्यावी. तापमानमध्ये अजून घट होणार आहे. विशेष करून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकाची काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यात हुडहुडी! परभणीत पारा घसरला, पाहा ताजं हवामान अपडेट