TRENDING:

Rain Alert: ताशी 50 किमीने वारे वाहणार, वादळी पाऊस झोडपणार, संभाजीनगर, बीडसाठी 4 दिवस धोक्याचे!

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात गेल्या काही काळात पावसाचा जोर कायम आहे. आता पुन्हा वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
ताशी 50 किमीने वारे वाहणार, वादळी पाऊस झोडपणार, मराठवाड्यासाठी 4 दिवस धोक्याचे!
राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी वादळी पावसाची हजेरी कायम आहे. मराठवाड्यात देखील गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे राहतील. तसेच विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये आज सकाळपासूनच वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हलका ते मध्यम पावसाचा अंदाज असून वातावरणात उकाडा जाणवेल. आज तापमान हे 33 अंश सेल्सिअस असेल. तसेच शहरतात ताशी 40 ते 50 किलोमीटर वारे वाहतील.
advertisement
4/5
गेल्या काही दिवसांपासून सुरू असणारा पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहणार आहे. पुढील 4 दिवसांसाठी मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत गारपीट आणि वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा हवामान विभागाने वादळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीपिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Rain Alert: ताशी 50 किमीने वारे वाहणार, वादळी पाऊस झोडपणार, संभाजीनगर, बीडसाठी 4 दिवस धोक्याचे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल