नाद करा पण आमचा कुठं! छ. संभाजीनगरच्या 'हिंद केसरी' कॅप्टन बैलाची तब्बल इतक्या लाखांना विक्री
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामधील वाकी येथील शेतकरी हरिदास जंजाळ यांच्या ‘हिंद केसरी कॅप्टन’ या बैलाकडे पाहताच नजरा थबकतात. दमदार बांधा, ताठ उभी शरिरयष्टी आणि चमकदार काळी कातडी हा बैल महाराष्ट्रासह देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
advertisement
1/5

2/5
जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाकी या गावातील या कॅप्टनला मध्य प्रदेश येथील बैतुल गावच्या पशुप्रेमीने विकत घेतला आहे. हिंदकेसरी कॅप्टन बैलाची 16 लाख 51 हजारात विक्री झाल्याने जिल्ह्यात कॅप्टनची चर्चा आहे.
advertisement
3/5
हरिदास जंजाळ यांनी या बैलाचे नाव कॅप्टन असेल ठेवलेले आहे. हरिदास जंजाळ हे पशुपालन क्षेत्रातील नावलौकिक प्राप्त आहेत. ते उत्तम जातीचे जनावरे घेऊन त्यांना नियमित देखभाल, संतुलित आहार, तसेच त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करतात. याच कामातून त्यांनी मैसूर ठीलारी जातीच्या कॅप्टन बैलाला तयार केलं होतं.
advertisement
4/5
कॅप्टनला सांभाळत असताना जंजाळ यांनी दोन गडी देखभाली साठी ठेवले होते. त्याचबरोबर दुधासाठी दोन गाई विकत घेतल्या. दोन गाई सकाळ-संध्याकाळ पाच पाच लिटर दूध देत. हे दूध कॅप्टनला नियमित दिल जात होतं. कॅप्टनला नियमित आंघोळ घालावी लागत होती. तो मॅट शिवाय खाली बसत नव्हता. कॅप्टनचे वजन दोन क्विंटल 80 किलो व उंची पाच फूट सहा इंच होती. या सौंदर्यामुळे कॅप्टन ची ओळख एक आदर्श बैल म्हणून पंचक्रोशीत निर्माण झाली होती.
advertisement
5/5
हरिदास जंजाळ हे कॅप्टनला एका स्पर्धेसाठी घेऊन गेले असता स्पर्धेदरम्यान उत्तर प्रदेश येथील रामप्रसाद राठोड या पशुप्रेमीची नजर कॅप्टन वर पडली. अन तिथेच त्याने कॅप्टनला खरेदी करण्याचं ठरवलं. यातून 16 लाख 51 हजार रुपयांमध्ये कॅप्टनची विक्री झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
नाद करा पण आमचा कुठं! छ. संभाजीनगरच्या 'हिंद केसरी' कॅप्टन बैलाची तब्बल इतक्या लाखांना विक्री