TRENDING:

Beed: रस्त्याला भल्या मोठ्या भेगा, घरांना तडे; बीडमधील गावावर मोठं संकट, घटनास्थळाचे PHOTOS

Last Updated:
अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बीडमधील बालाघाटाच्या कुशीत वसलेल्या कपिलधारवाडीला भूस्खलनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
advertisement
1/7
रस्त्याला मोठ्या भेगा, घरांना तडे; बीडमधील गावावर मोठं संकट, घटनास्थळाचे PHOTOS
अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बीडमधील बालाघाटाच्या कुशीत वसलेल्या कपिलधारवाडीला भूस्खलनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक घरांच्या तसंच जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भिंतींना तडे गेले आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे गाव दहशतीखाली आहे तात्काळ या गावाचं सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावं, अशी मागणी केली जात आहे.
advertisement
2/7
कपिलधारवाडीत सध्या ९५ घरे आणि सुमारे ५०० लोकसंख्या असून गावकरी अक्षरशः जीव मुठीत धरून राहत आहेत.
advertisement
3/7
गेल्या ५ वर्षांपासून पुनर्वसनाची मागणी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने 'पुणे जिल्ह्यातील माळीणसारखी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे काय?' असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
advertisement
4/7
सध्या कपिलधारवाडीतील नागरिकांना मन्मथ स्वामी देवस्थान इथं तात्पुरते स्थलांतरित करून राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
5/7
मात्र तरीही काही ग्रामस्थांचा वावर गावात सुरू असून कधीही दुर्घटना घडण्याचा धोका कायम आहे.
advertisement
6/7
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने तातडीने दक्षता घेऊन स्थिर पुनर्वसनाची पावले उचलली नाहीत, तर मोठी मानवी हानी होऊ शकते.
advertisement
7/7
या घटनेनंतर अद्यापही बीड प्रशासनाकडून कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावं, अशी मागणी केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Beed: रस्त्याला भल्या मोठ्या भेगा, घरांना तडे; बीडमधील गावावर मोठं संकट, घटनास्थळाचे PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल