TRENDING:

राहाच्या जन्माच्या 6,570 दिवसानंतर मम्मी आलिया भट्ट देणार स्पेशल गिफ्ट, आतापासून सुरू केली तयारी

Last Updated:
Alia Bhatt-Raha Kapoor : आलियाने आपल्या लाडक्या लेकीच्या अठराव्या वाढदिवसाला तिला काय खास भेट द्यायची हे देखील आत्तापासूनच ठरवलं आहे, आणि तिची तयारीही सुरू केली आहे!
advertisement
1/11
राहाच्या जन्माच्या 6,570 दिवसानंतर मम्मी आलिया भट्ट देणार स्पेशल गिफ्ट
मुंबई: बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट तिची लेक राहा कपूरची किती काळजी घेते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. राहाच्या भविष्यासाठी ती अनेक गोष्टींचं नियोजन करत आहे.
advertisement
2/11
आता तर आलियाने आपल्या लाडक्या लेकीच्या अठराव्या वाढदिवसाला तिला काय खास भेट द्यायची हे देखील आत्तापासूनच ठरवलं आहे, आणि तिची तयारीही सुरू केली आहे!
advertisement
3/11
आलिया भट्टने नुकत्याच अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या कार्यक्रमात आपल्या या खास गिफ्टचा खुलासा केला, ज्याचं उपस्थितांनी खूप कौतुक केलं.
advertisement
4/11
आलियाने सांगितले की, तिला ही कल्पना तिच्या एका मैत्रिणीकडून मिळाली, जिने तिच्या मुलासाठीही असंच काहीतरी केलं होतं. त्यामुळे आलिया दर महिन्याला आपल्या लेकीला एक ई-मेल पाठवते. या ई-मेलमध्ये छोट्या छोट्या गोष्टी, त्या महिन्यातील आठवणी, फोटो आणि गोड मेसेज लिहिलेले असतात.
advertisement
5/11
हे एक प्रकारचं दर महिन्याचं कलेक्शन आहे, असं आलियाने सांगितलं. यात खास फोटो आणि काही एका ओळीचे संदेश आहेत. जसे की ‘तू याचा खूप आनंद घेशील’.
advertisement
6/11
आलिया ही जमवलेल्या आठवणींची अमूल्य भेट राहा अठरा वर्षांची झाल्यावर देणार आहे. तिने गमतीत सांगितलं की, "असंही होऊ शकतं राहा १३ किंवा १४ वर्षांची असतानाच ते वाचण्याचा हट्ट करेल." ट्विंकल खन्नानेही आलियाच्या या कल्पनेला अत्यंत गोड आणि भावनिक म्हटलं.
advertisement
7/11
आलिया भट्टने आई झाल्यानंतरच्या बदलांबद्दल मनमोकळं बोलताना सांगितलं. आपल्या आईचं नाव घेत ती म्हणाली, “माझी आई सोनी राजदान मला नेहमी म्हणायची, 'तुला आश्चर्य वाटेल की तू आई झाल्यावर कितीतरी गोष्टी विसरून जाशील.'”
advertisement
8/11
आलियाने हसून हे कबूल केलं की, तिच्या आईच्या त्या वाक्यात खूप तथ्य आहे. ती आता स्वतः आई झाल्यामुळे हा अनुभव घेत आहे की, खरंच अनेक गोष्टींचा विसर पडतो आणि लक्षात राहत नाहीत.
advertisement
9/11
आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या राहाचं आगमन झालं. आई झाल्यानंतर आलियाचं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.
advertisement
10/11
ती लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे, यात तिच्यासोबत तिचा पती रणबीर कपूर आणि अभिनेता विकी कौशल हे दोन दिग्गज कलाकारही असतील.
advertisement
11/11
याशिवाय, ती गुप्तहेर कथानकावर आधारित असलेल्या 'अल्फा' या चित्रपटातही मुख्य भूमिकेत झळकणार आहे, जो २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राहाच्या जन्माच्या 6,570 दिवसानंतर मम्मी आलिया भट्ट देणार स्पेशल गिफ्ट, आतापासून सुरू केली तयारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल