फडणवीसांच्या सरकारमधील ९ मंत्र्यांना पराभवाचा धक्का, श्वास रोखून धरायला लावणारे राज्यातील निकाल
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Nagar Parishad Election Results: नगर परिषद निवडणूक निकालांत महायुती सरकारमधील मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. बहुतांश मंत्र्यांना आपले गड राखण्यात यश मिळाले. परंतु सरकारमधील ९ मंत्र्यांना गृह तालुक्यात अर्थात मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले.
advertisement
1/9

वर्ध्यात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना मोठा धक्का बसलाय. भाजपाचे उमेदवार निलेश किटे यांचा दारुण पराभव झाला. निलेश किटे हे पंकज भोयर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. परंतु त्यांना निवडून आणण्यात भोयर यांना यश आले नाही.
advertisement
2/9
फडणवीस सरकारमधील महत्त्वाचे मंत्री संजय सावकारे यांना भुसावळमध्ये मोठा धक्का बसला. मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. पत्नीला निवडून आणण्यात सावकारे यांना अपयश आले.
advertisement
3/9
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना श्रीवर्धनमध्ये मोठा धक्का बसला. कारण राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी शिंदेसेना-ठाकरेसेना आणि काँग्रेस एकत्रित आली होती. याचाच परिणाम ठाकरे सेनेचे अतुल चौगुले हे विजयी झाले.
advertisement
4/9
धरणगाव नगरपालिका निवडणुकीत जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना धक्का बसला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या लिलाबाई सुरेश चौधरी या विजयी झाल्या. शिंदेसेनेच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का बसला. तब्बल २५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणत शिवसेना ठाकरे गटाने येथे ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
advertisement
5/9
मंत्री जयकुमार रावल यांना धक्का देत शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विजय संपादित केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कालावती माळी या विजयी झाल्या.
advertisement
6/9
मालवण आणि कणकवली या दोन्ही ठिकाणी मंत्री नितेश राणे यांना तगडा झटका बसला. मालवणमध्ये नीलेश राणे यांच्या सूक्ष्म नियोजन आणि डावपेचांनी नितेश राणे यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. कणकवली येथेही संदेश पारकर विजयी झाल्याने नितेश राणे यांना जबर धक्का बसला.
advertisement
7/9
मुरगुड नगरपालिकामध्ये मुश्रीफ गटाला पुन्हा धक्का बसला आहे. मुरगुड नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकला. शिवसेना शिंदे गटाचे 16 नगरसेवक विजयी झाले आहेत. तर सेनेच्या नगराध्यक्षपदी सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवर विजय मिळाला आहे.
advertisement
8/9
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणूक ही भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. विशेष म्हणजे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन इथे तळ ठोकून होते. परंतु त्यांच्या पदरी निराशा पडली. भाजपचे कैलास घुगे यांचा पराभव झाला असून शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार विजयी झाल्या.
advertisement
9/9
अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना धक्का बसला. भाजपचे स्वप्निल व्हत्ते जवळपास ९०० हून अधिक मतांनी विजयी झाले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन पक्षात मोठी चुरस होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
फडणवीसांच्या सरकारमधील ९ मंत्र्यांना पराभवाचा धक्का, श्वास रोखून धरायला लावणारे राज्यातील निकाल