पहिल्याच पावसात महाराष्ट्रात घडला चमत्कार? जमिनीतून आलं निळं पाणी
- Published by:Priya Lad
Last Updated:
पावसाळ्यात वीज कोसळणं, दरड कोसळणं, भूस्खलन अशा घटना घडतात. पण कधी जमिनीतून निळं पाणी आल्याचं तुम्ही ऐकलं तरी होतं का? (प्रतिनिधी : बालाजी निरफळ)
advertisement
1/5

राज्यात नुकताच पाऊस सुरू झाला आहे. पावसाळ्यात सामान्यपणे वीज कोसळणं, दरड कोसळणं, भूस्खलन अशा घटना घडतात. पण धाराशिवमध्ये वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. इथं चक्क जमिनीतून निळं पाणी आलं.
advertisement
2/5
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला येथे एका शेतात वीज पडली त्यानंतर जमिनीतून निळ्या रंगाचं पाणी निघाल्याचं समोर आलं.
advertisement
3/5
एखाद्या ठिकाणी वीज कोसळली की तिथं सामान्यपणे आग लागते. पण इथं वीज पडली आणि जमिनीतून निळ्या रंगाचं पाणी आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाऊ लागलं.
advertisement
4/5
नागरिकांमध्ये उत्सुकता आणि भीतीही निर्माण झाली होती. या प्रकारानंतर प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावचे तलाठी आणि डिपार्टमेंटचे अधिकारी यांनी भेट दिली.
advertisement
5/5
वीज पडल्यानंतर जमिनीतून आलेल्या या निळ्याचे पाण्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान याचं नेमकं रहस्य काय हे शोधलं जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/धाराशिव/
पहिल्याच पावसात महाराष्ट्रात घडला चमत्कार? जमिनीतून आलं निळं पाणी