धक्कादायक! गडचिरोलीमध्ये अख्ख कुटुंब संपलं, जो अंत्यविधीसाठी हजर त्याचा गूढ मृत्यू; मावशीनंही सोडला प्राण
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा पंधरा दिवसांच्या आत गूढ मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
advertisement
1/5

गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा पंधरा दिवसांच्या आत गूढ मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
advertisement
2/5
ही घटना अहेरी तालुक्यातल्या महागाव बुद्रुक गावातील आहे. या गावात कुंभारे कुटुंबातील पाच जणांचा पंधरा दिवसांच्या आत मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील आई-वडील विवाहित मुलगी आणि मुलगा व अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या मावशीचा देखील मृत्यू झाला आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
3/5
महागाव येथील विजया कुंभारे यांची तब्येत बिघडली, डोकेदुखी आणि थकव्याचा त्रास होऊ लागला, त्यामुळे त्यांचे पती त्यांना आधी आपल्या कारने चंद्रपूरला आणि नंतर नागपूरला घेऊन गेले. मात्र त्यानंतर ते लगेच आजारी पडले. 26 सप्टेंबरला विजया यांचे पती शंकर कुंभारे यांचा मृत्यू झाला. तर 27 सप्टेंबरला सकाळी विजया यांचा मृत्यू झाला.
advertisement
4/5
दरम्यान त्यांच्या अंत्यविधीसाठी माहेरी आलेली त्यांची विवाहित कन्या कोमल हिचा देखील आठ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मुलगा रोशन कुंभारे जो सिरोचा इथे पोस्टमन म्हणून कार्यरत होता त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. अंत्यविधीसाठी उपस्थित असलेली रोशनची मावशी आनंदा उराडे यांची देखील प्रकृती अचानक खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
5/5
एवढचं नाही तर त्यांच्या चालकाची प्रकृती देखील अत्यवस्थ आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पंधरा दिवसांच्या आत पाच जणांचा मृत्यू झाला असून, या प्रकरणातील गूढ वाढलं आहे. तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/गडचिरोली/
धक्कादायक! गडचिरोलीमध्ये अख्ख कुटुंब संपलं, जो अंत्यविधीसाठी हजर त्याचा गूढ मृत्यू; मावशीनंही सोडला प्राण