Amalner News : सकाळी अंगणात खेळत होती, दुपारी जुलाब-उलट्या सुरू; जळगावत 10 बालकांसोबत काय घडलं?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Amalner News : जळगावातील अमळनेर तालुक्यातील गांधली येथील दहा बालकांना एरंडी सदृश्य बिया खाल्याने विषबाधा झाल्याची शक्यता आहे. (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी)
advertisement
1/5

जळगावातील अमळनेर तालुक्यातील गांधली येथील दहा बालकांना एरंडी सदृश्य बिया खाल्याने विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सर्व मुलांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
advertisement
2/5
सर्व बालकांना उपचारासाठी अमळनेरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही सर्व मुले दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका मंदिराच्या प्रांगणात खेळत असताना एका मुलीने एरंडीच्या बियांसारखा पदार्थ आणला. त्या बिया सर्व मुलांनी खाल्ल्या.
advertisement
3/5
काहींनी एकदोन बिया तर काहींनी जास्त झाल्यामुळे सुमारे साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांना अचानक जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या. सुरुवातीला दोन बालके, नंतर पाच, नंतर तीन अशी एकापाठोपाठ दहा बालके उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
advertisement
4/5
अमळनेर तालुक्यातील गांधली येथील जोया सुलतान पिंजारी वय 9, अयान सुलतान पिंजारी वय 11, अर्जुन सुरेश भिल वय 10, करण सोमा भिल वय 9, अक्षरा सुनील भिल वय 10, नर्गिस सुलतान पिंजारी वय 3, गोकुळ प्रकाश भिल वय 12 वर्षे, अश्विनी सुरेश भिल वय 11 वर्षे, संगीता नारायण संदानशीव वय 10, किरण अविनाश भिल वय 11 सर्व रा. गांधली अशी रुग्णालयात दाखल बालकांची नावे आहेत.
advertisement
5/5
वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रांजली पाटील, डॉ प्रकाश ताडे यांनी तातडीचे उपचार सुरू केले. प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना घटना कळताच त्यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना ग्रामीण रुग्णालयात पाठवून बालकांच्या आरोग्य सेवेबाबत आदेश दिले. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी देखील रुग्णालयात जाऊन बालकांची चौकशी केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जळगाव/
Amalner News : सकाळी अंगणात खेळत होती, दुपारी जुलाब-उलट्या सुरू; जळगावत 10 बालकांसोबत काय घडलं?