ST Bus Accident : अचानक धावत्या बसचे एक्सेल तुटलं, चाक निखळून बाजूला, गाडीत 51 प्रवासी, पुढे.. ; पाहा PHOTO
- Published by:Rahul Punde
Last Updated:
ST Bus Accident : जळगावातील जामनेरजवळ धावत्या बसचे चाक अचानक निखळून पडले. बस चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील 51 प्रवाशांचे प्राण वाचले. (इम्तियाज अहमद, प्रतिनिधी)
advertisement
1/6

एसटी महामंडळाची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांत घडल्या आहेत. कुठे छत गळतंय, तर कुठे क्लच खराब आहे. आता तर चक्क चाकच निखळून गेलं आहे.
advertisement
2/6
जळगावातील भुसावळ जवळ धावत्या बसचे अचानक एक्सल तुटून चाक निखळून पडल्याची धक्कादायक घटना घटना काही वेळापूर्वी घडली.
advertisement
3/6
चालकाच्या सतर्कतेने अपघातातील 51 प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही अथवा कोणीही जखमी झालेलं नाही.
advertisement
4/6
छत्रपती संभाजी नगर ते मुक्ताईनगर एम एच 13 सी यू 6921 या क्रमांकाची बस मुक्ताईनगरकडे जात होती. जामनेर बसस्थानकातून बस निघाल्यानंतर धावत्या बसचे अचानक एक्सेल तुटले आणि चाक निखळून बाजूला झाले.
advertisement
5/6
चालकाने प्रसंगावधान दाखवत बसवर नियंत्रण मिळवले तसेच काही अंतरावर जाऊन बस सुखरूप उभी केली. त्यामुळे बसमधील 51 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. बसमधील प्रवाशांनी चालकाचे आभार मानले आहेत.
advertisement
6/6
मुक्ताईनगर आगाराची ही बस असल्याची माहिती समोर आली असून चालकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जळगाव/
ST Bus Accident : अचानक धावत्या बसचे एक्सेल तुटलं, चाक निखळून बाजूला, गाडीत 51 प्रवासी, पुढे.. ; पाहा PHOTO